SBI ची जेष्ठ नागरिकांसाठी भेट ! 30 जूनपर्यंत ‘या’ योजनेमध्ये करू शकतात गुंतवणूक

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी असणारी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) जेष्ठ नागरिकांसाठी एक मोठी भेट दिली आहे. तर बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजनेच्या मुदतीत तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. तर मे महिन्यात, स्टेट बँक ऑफ इंडियाने, SBI Wicker ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेव योजना जारी करून, तर याची मुदत सप्टेंबरपर्यंत होती. ती डिसेंबरच्या अखेरीस पुन्हा वाढवण्यात आली, ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आली. परत आणखी तिसऱ्या वेळाही ती मुदत वाढवून ३० जून २०२१ करण्यात आली आहे.

कोरोनो महामारीत ज्येष्ठ नागरिकांना अधिक व्याज दरासाठी विशेष F.D.योजना सुरू केली गेली. SBI बँकेने विशेष F.D योजना ३ महिन्यांसाठी ३० जूनपर्यंत वाढवली आहे. विशेष एसबीआय विकेअर डिपॉझिट योजनेत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या ठेवींवर जास्त व्याज दिले जाते. तर या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना F.D वर ०.३० टक्के अधिक व्याज मिळते. त्याचबरोबर एसबीआय सर्व कालावधीच्या मुदत ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना आधीपासूनच ०.५० टक्के जास्त व्याजदर देत आहे. अशा प्रकारे, SBI Wicker ठेवीचा लाभ घेऊन ज्येष्ठ नागरिक त्यांच्या F.D वर ०.८० ( ०.५०+०.३०) टक्के जास्त व्याज घेऊ शकतात.

दरम्यान, ६० वर्ष किंवा त्याहून जादा वयाची असणारी व्यक्ती या योजनेत गुंतवणूक (Investment) करू शकते. ही योजना ५ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी साठी आहे. (पूर्ण वाढ) मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढल्यास अतिरिक्त व्याज मिळणार नाही. तसेच SBI Wicker ठेवीअंतर्गत नवीन F.D खाते चालू करणे किंवा जुन्या एफडी नूतनीकरण या दोन्ही गोष्टीवर अधिक व्याजाचा फायदा मिळू शकेल. तर SBI सर्वसामान्यांना ५ वर्षांच्या F.D वर ५.४ टक्के व्याज देते. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने विशेष F.D योजनेत निश्चित ठेव ठेवली असेल तर F.D ला लागू असणारा व्याजदर हा ६.२० टक्के एवढा असणार आहे.