SBI ची ग्राहकांसाठी मोठी घोषणा ! घर बसल्या मिळणार पैसे जमा करण्याची अन् काढण्याची सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने कोरोना व्हायरसपासून ग्राहकांचा बचाव करण्यासाठी एक विशेष सुविधा सुरु केली आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहक त्यांचे बँकेचे काम घरबसल्या करू शकतात. जर ग्राहकांना रकमेची गरज असेल, तर बँक ग्राहकांना घरीच रक्कम डिलिव्हरी करण्यास तयार आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांना घरीच बँकिंग सेवा उपलब्ध करत आहे. यावेळी ही सुविधा केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिव्यांगांसाठी आहे.

जाणून घ्या एसबीआय डोअरस्टेप बँकिंग सर्व्हिसच्या काही खास गोष्टी :

१. या सेवेत रक्कम घेणे-देणे, चेक देणे, ड्राफ्टची डिलिव्हरी, टर्म डिपॉजिट एडव्हायजरची डिलिव्हरी, जीवन प्रमाणपत्र आणि केवायसी डॉक्युमेंट्स देणे यासारख्या सुविधा आहेत.

२. कामकाजाच्या दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत 1800111103 नंबरवर फोन करून सेवेसाठी विनंती करता येईल.

३. सेवा विनंतीसाठी रजिस्ट्रेशन होम ब्रांचमध्ये होईल.

४. डोअरस्टेप बँकिंग सेवा केवळ पूर्णपणे केवायसी झालेल्या ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे.

५. विना-आर्थिक व्यवहारासाठी ६० रुपये आणि जीएसटी व्हिजिट शुल्क आकारला जाईल. आर्थिक व्यवहारासाठी १०० रुपये शुल्क आणि जीएसटी प्रति व्हिजिट शुल्क असेल.

६. रोख रक्कम काढण्यासाठी आणि रोख ठेवीसाठी दररोज व्यवहार २०,००० रुपये मर्यादा आहे.

७. या सेवांसाठी खातेदारांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकासह होम ब्रांचपासून ५ किमीच्या क्षेत्रात हजर रहावे लागेल.

८. जॉईंट अकाउंट असलेल्या ग्राहकांनाही या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

९. वैयक्तिक-किरकोळ खातीसुद्धा या सुविधेस पात्र ठरणार नाहीत.

१०. पैसे काढणे केवळ चेक किंवा पासबुकद्वारे करता येईल.

या बँका देखील देत आहेत डोअरस्टेप सर्व्हिस
एसबीआय शिवाय एचडीएफफसी, आयसीआय बँक, एक्सिस बँक आणि कोटक बँकही आपल्या ग्राहकांना डोअरस्टेप सर्व्हिस देत आहे.