SBI ‘या’ 8 खात्यांवर नाही आकारत मिनिमम ‘बॅलन्स’ चार्ज, कसे बदलायचे आपले खाते ? जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2018-19 मध्ये खात्यात मिनिमम मंथली बॅलन्स न ठेवल्यामुळे पेनल्टी म्हणून 1996.46 कोटी रुपये मिळाले आहेत. जर तुम्हाला मिनिमम बॅलन्सच्या पॅनल्टीपासून वाचायचे असेल तर SBI तुम्हाला काही खास अकाऊंटची सुविधा देतं. एसबीआयमध्ये तुम्ही अनेक खास अकाऊंट उघडू शकता ज्यात मिनिमम बॅलन्सचा नियम लागू होत नाही. आज आपण याबाबत जाणून घेणार आहोत.
एसबीआयनं जारी केलेल्या माहितीनुसार, या 8 बँक खात्यात तुम्ही झिरो बॅलन्स ठेवला तरीही तुम्हाला मिनिमम बॅलन्स चार्ज लागू होत नाही. यात लहान बचत, बेसिक सेव्हींग्स अकाऊंट सहित अनेक खात्यांचा समावेश आहे. ही खाती पुढीलप्रमाणे-
1) फायनान्शियल इनक्लूजन अकाऊंट
2) नो फ्रील अकाऊंट
3) सॅलरी पॅकेज अकाऊंट
4) बेसिक सेव्हींग बँक अकाऊंट
5) स्मॉल सेव्हींग्स अकाऊंट
6) पहला कदम किंवा पहली उडान
7) पेंशनर्स अकाऊंट
8) मायनर अकाऊंट
सध्याचं अकाऊंट बदलणं अगदी सोपं- तुम्ही तुमचं सध्याचं बचत खातं या 8 पैकी एका खात्यात कनव्हर्ट करू शकता. जर तुम्ही तुमचं खातं या 8 पैकी एका खात्यात रुपांतरीत केलं तर तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवण्याची आवश्यकता नाही.
सध्या एसबीआयच्या बचत खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची अट आहे. तसे न केल्यास काही चार्ज लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकतर तुम्ही मिनिमम बॅलन्स मेंटेंन करा किंवा तुमचं अकाऊंट कनव्हर्ट करून घ्या.
Visit : Policenama.com
- सावधान ! गरम-गरम चहा पिण्याची सवय पडू शकते महागात, ‘हे’ आहेत ३ धोके
- दाट केसांसाठी बहुगुणी आहे आवळा, होतील ‘हे’ ६ फायदे
- सावधान ! ‘या’ ५ गोष्टी वॉशरूममध्ये घेऊन जाऊ नका, जाणून घ्या
- बाळंतपणानंतरचे वजन कमी करायचे आहे का ? ‘हे’ ७ उपाय करा
- अपचन, कंबरदुखी, आणि नैराश्यावर ‘हा’ एकच उपाय, हे आहेत ५ फायदे
- उपवास केल्याने होतात हे १४ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- ‘हे’ असू शकते जुनाट आजाराचे मूळ, वेळीच लक्ष देऊन करा हे उपाय