SBI ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची बातमी, लवकर करा ‘हे’ कामे, अन्यथा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी खुप महत्वाची बातमी आहे. बँकेकडून जारी नोटीसमध्ये म्हटले आहे की, ग्राहकांनी पॅन कार्ड (Pan Card) सोबत आधार कार्ड (Aadhaar Card) लिंक करावे. यासाठी बँकेकडून 30 सप्टेंबरपर्यंतची डेडलाईन आहे. SBI बँकेनुसार, जर ग्राहकांनी वेळीच हे काम केले नाही तर आगामी काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल.

बँकेकडून ट्विट करत लिहिले आहे, आम्ही आमच्या ग्राहकांना सल्ला देतो की, कोणत्याही प्रकारची असुविधा टाळण्यासाठी पॅन कार्डला आधारसोबत लिंक करा. जर ठरलेल्या कालावधीत ग्राहकांनी हे महत्वाचे काम केले नाही तर त्यांचे पॅन कार्ड इनव्हॅलिड मानले जाईल. कारण आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य झाले आहे.

 

असे करा PAN Card – Aadhaar Card Link

– जर तुम्ही आपले पॅन कार्ड आधारसोबत लिंक केले असेल तर या लिंकवर क्लिक करून आपले स्टेटस चेक करू शकता. यासाठी तुम्हाला https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जावे लागेल.

– डावीकडे Link Aadhaar च्या पर्यायावर क्लिक करा. आपले स्टेटस पाहण्यासाठी Click here वर क्लिक करा.

– आपले स्टेटस पाहण्यासाठी हायपर लिंक Click here वर क्लिक करा. येथे तुम्हाला तुमच्या आधार आणि पॅनची डिटेल भरावी लागेल.

– जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक असेल तर your PAN is linked to Aadhaar Number हे कन्फर्मेशन दिसेल.

– जर तुम्ही अजूनपर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर या लिंकवर https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर क्लिक करा. यानंतर Link Aadhaar वर क्लिक करा.

– यानंतर तुमच्या डिटेल्स भरा. आणि पॅन कार्ड आधार कार्ड होईल.
एसएमएस सेवेचा वापर करण्यासाठी 567678 किंवा 56161 वर मेसेज पाठवून सुद्धा आधार-पॅन लिंक रू शकता.

Web Titel :- SBI | state bank of india aadhaar card pan card link deadline 30th september

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘त्यांनी’ पोलिसांना ‘बोलावले’ अन्पो लिसांनीच घातल्या ‘बेड्या’ ! ‘मानवाधिकार’च्या 7 पदाधिकार्‍यांना पोलिसांनी का केली अटक? जाणून घ्या सविस्तर

Pune Crime | ‘गुप्ता’ व ‘गाडा’ बिल्डरशी संगनमत करुन जागा बळकाविण्यास ‘मदत’; पुणे ‘महापालिका’, हवेलीच्या ‘भूमि अभिलेखा’च्या ‘त्या’ अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

Pune News | काँग्रेसच्या माजी आमदाराची BJP वर टीका, मोहन जोशी म्हणाले – ‘मोठे प्रकल्प राबविण्यात भाजपला अपयश’