फायद्याची गोष्ट ! ‘या’ स्कीमद्वारे 60 वर्षानंतर SBI सह अनेक बँक देतील तुम्हाला दरमहा पेन्शन, जाणून घ्या

नवी दिल्ली – वृत्तसंस्था – पूर्ण आयुष्यभर आपण आपले घर उत्तमरीत्या चालावे यासाठी पैसे कमवीत असतो , पण वयाच्या साठाव्या वर्षानंतर काम करून पैसे कमविणे अशक्य होते, कारण कामात तेवढा उत्साह दिसत नाही. आता पुढे कसे होणार या चिंतेने लोकांना ग्रस्त केलेले असते पण जर आपण आपल्या संपत्तीचा नीट उपयोग केला तर ती चिंता सुद्धा दूर होऊ शकते. बऱ्याच वेळा लोकं आपल्या हक्काच्या घरासाठी आपली सर्व पुंजी खर्ची करत असतात त्यामुळे त्यांच्याकडे निवृत्तीनंतर उत्पन्नाचा स्रोत राहत नाही. जर तुम्ही खाजगी कंपनीमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला निवृत्तीनंतर पेन्शन कशी मिळणार यांची काळजी असते पण, आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही जर तुमच्याकडे घर असेल तर एसबीआय आणि पीएनबी बँक तुम्हाला पेन्शन देणार आहे . काहीवेळा असे होते काही ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनची गरज पडत नाही कारण त्यांचा परिवार त्यांची काळजी घेत असतो.

रिवर्स मॉर्गेज लोन (Reverse Mortgage Loan) ही स्कीम समजण्यासाठी आपण एक उदहारण पाहुयात , जसे की गृह कर्ज घेताना आपल्याला सर्व कागदपत्रे जमा करावे लागतात आणि त्यावर दर महिन्याला काही रक्कम बँकेला द्यावी लागते त्याला आपण ईएमआय म्हणतो. रिवर्स मॉर्गेज लोन मध्ये बँक तुमचे घर गहाण ठेवते, प्रत्येक महिन्याला बँक आपल्याला पैसे देते. जर कस्टमर चा अचानक मृत्य झाला तर घर बँकेचे होऊन जाते . ह्या स्कीमचा फायदा घेण्यासाठी पुरुषांचे वय ६० आणि महिलांचे वय ५८ असणे गरजेचे आहे.

स्कीमनुसार बँक प्रत्येक महिन्याला तुम्हाला पैसे खात्यात जमा करते पण नियमांनुसार ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तीलाच ह्या स्कीमचा फायदा घेता येतो. काही बँक ७२ व्या वर्षानंतर कर्ज देत नाही. ह्या स्कीम मध्ये फक्त १५ वर्षे पर्यंतच कर्ज मिळते. नवरा – बायको या दोघांनी जर कर्जासाठी अप्लाय केले असेल तर वयोमर्यादा अनुक्रमे ६० आणि ५८ असणे आवश्यक आहे. प्रत्येक महिन्याला आपल्याला किती पैसे मिळणार हे आपल्या घराच्या किंमतीवर ठरते. घराच्या किंमतीवर ६० टक्के रकमेचे कर्ज बँक आपल्याला देते, यामध्ये व्यक्ती आपल्या घरात राहू शकतो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांना हे घर खरेदी करायचे असेल तर बँकेला घराची किंमत देऊन खरेदी करता येते. कर्जाची ही स्कीम ज्येष्ठ नागरिकांसाठी असून, ज्यांना पेन्शन नसते त्यांच्यासाठी ही स्कीम कोणत्याही संजिवनीपेक्षा कमी नाही. या स्कीमचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे जेणेकरून पुढील आयुष्य आनंदात घालवता येईल.