SBI चा अलर्ट ! इंटरनेटवर ‘सर्च’ करू नका ‘कस्टमर केअर नंबर’, रिकामं होऊ शकतं बँक अकाऊंट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांना पुन्हा एकदा चेतावणी दिली आहे. SBI नं ग्राहकांना सावध करत म्हटलं आहे की, इंटरनेटवर कस्टमर केअर नंबर शोधणं तुम्हाला महागात पडू शकतं. बँकेनं ट्विट करत म्हटलं आहे की, त्यांनी फेक कस्टमर केअर नंबरच्या फंद्यात पडू नये. नाहीतर ते फसवणुकीला बळी पडू शकतात. बँकेनं असंही म्हटलं आहे की, नेहमी बँकेची अधिकृत वेबसाईट bank.sbi लाच संपर्क करावा.
काय करू नये ?
– एसबीआयनं ट्विट करत म्हटलं आहे की, ग्राहकांनी कधीच इंटरनेटवरून दिलेल्या बँक किंवा ब्रँचच्या नंबरवर कॉल करू नये.
– आपले पर्सनल डिटेल्स कोणाही सोबत शेअर करू नये.
– तुमचे बँक डिटेल्स जसे की, बँक अकाऊंट नंबर, कार्ड नंबर, सीव्हीव्ही, ओटीपी आणि पिन याची माहिती कोणालाही देऊ नका.
काय करावं ?
– बँकेनं सांगितलं की, फक्त https://bank.sbiवर देण्यात आलेल्या कस्टमर केअर नंबरवरच संपर्क साधावा.
– ब्रँचचे डिटेल्स केवळ https://bank.sbi/web/home/locator/branch वरूनच मिळवावेत.
– SBI सोबत संपर्क साधण्यासाठी केवळ अधिकृत मार्गांचाच वापर करावा.
हे आहेत SBIचे अधिकृत हेल्पलाईन नंबर
एसबआयनं केलेल्या ट्विटमध्ये कस्टमर केअर नंबरही सांगितला आहे. तुम्ही कोणत्याही मदतीसाठी SBIचे 24×7 हेल्पलाईन नंबर 1800 11 2211, 1800 425 3800 किंवा 080-26599990 या नंबरवर संपर्क साधावा.
…तर त्वरीत बँकेला सूचना द्या
एसबीआयनं दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, जर तुमच्यासोबत बँकेच्या खात्याबाबत काही फसवणुकीचा प्रकार झाला तर त्वरीत याबाबत बँकेला माहिती द्या. आरबीआय महणते की, तुमच्याकडून लवकर सूचना मिळाल्या तर आम्हीही ताबडतोब कारवाई करू शकतो. बँक म्हणते, आपल्या खात्यातील कोणत्याही अनधिकृत कृतीसाठी सतर्क रहा आणि त्वरित आम्हाला कळवा.
Don't get misled by fake customer care numbers & avoid falling prey to fraudsters. Ensure that you always procure contact and branch information from the official #SBI website – https://t.co/1RhV1IpQyW#SBI #StateBankOfIndia #SecurityTips #KnowledgeIsPower #CustomerSafety pic.twitter.com/MVOZRS2NzY
— State Bank of India (@TheOfficialSBI) November 20, 2019
Visit : Policenama.com
- सकाळची पौष्टीक न्याहारी करते आजारांपासून दूर ठेवण्यास मदत
- ऑफिसमधील वातावरणाचा होतो आरोग्यावर परिणाम, ‘ही’ आहेत 8 कारणे
- सावधान ! आजारावर ‘ऑनलाइन उपचार’ शोधताय ? ‘या’ 8 गोष्टी लक्षात ठेवा
- मित्रमंडळींपासून दूर राहिल्यास वार्धक्यात विस्मृतीचा धोका ! ‘हे’ आहेत 4 दुष्परिणाम
- पाणी प्यायचे कसे ? चुकीच्या पद्धतीमुळे होईल पचनाचा आजार, ‘हे’ 8 नियम पाळा
- बाळंतपणानंतर ‘ही’ अतिघाई ठरू शकते आरोग्यासाठी घातक ! जाणून घ्या 6 उपाय
- ‘विहंगम’ योग संस्थानाद्वारे पुण्यात भव्य अध्यात्मिक कार्यक्रम, ५०१ कुंडीय विश्व शांती यज्ञ, तुम्ही देखील घ्या ‘लाभ’ !