SBI ने खात्यातून पैसे काढण्याच्या नियमात केला मोठा बदल, जाणून घ्या यासंबंधी सर्व कामाची माहिती
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडियाने कोरोना व्हायरस महामारी पहाता कॅश काढण्याच्या नियमात बदल केला आहे. बँकेने ब्रँचमध्ये जाऊन पैसे काढण्याचे लिमिट वाढवले आहे. बँकने नॉन-होम ब्रँचमधून सुद्धा पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे, ज्यामध्ये अनेक ग्राहकांना सवलत मिळणार आहे. या नियमानंर आपल्या शहरातच्या बाहेर राहत असलेल्या लोकांना सहजपणे बँकेतून पैसे काढता येऊ शकतात.
एसबीआयने कॅश विड्रॉलचे लिमिट वाढवत 50 हजार रुपयांवरून एक लाख रुपये केले आहे. म्हणजे बँकेने हे लिमिट डबल केले आहे, ज्यामुळे अनेक लोकांना फायदा होणार आहे. मनी 9 च्या रिपोर्टनुसार, एसबीआयने नॉन होम ब्रँचमध्ये चेकच्या माध्यमातून कॅश काढण्याची रक्कम दुप्पट करून 1 लाख रुपये प्रति दिवस केली आहे. ही मर्यादा अगोदर 50 हजार होती.
पासबुकद्वारे पैसे काढण्याच्या मर्यादेत सुद्धा वाढ
पासबुकद्वारे पैसे काढण्याचे लिमिट सुद्धा वाढवण्यात आले आहे. अगोदर सेव्हिंग पासबुकद्वारे एका दिवसात पाच हजार रुपयेच काढता येत होते, आता ते पाचपट वाढवले आहेत. आता ग्राकांना पासबुकद्वारे 25 हजार रुपये काढता येऊ शकतात. हा नियम होम ब्रँच आणि नॉन होम ब्रँचमधून होणार्या व्यवहारावर लागू होईल. तर, थर्ड पार्टी कॅश विड्रॉलसाठी सुद्धा 50 हजार रुपयांपर्यंत मंजूरी दिली आहे. महामारी दरम्यान लोकांद्वारे जास्त कॅश ठेवण्याच्या कारणामुळे कॅश ट्रांजक्शनमध्ये वाढ झाली होती.
एटीएममधून कॅश काढल्यास सुद्धा फी
लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार, बेसिक सेव्हिंग खातेधारक आता कोणत्याही ब्रँच किंवा एटीएममधून एक महिन्यात केवळ 4 वेळाच विना शुल्क पैसे काढू शकतात. यानंतर खातेधारकाला एसबीआय किंवा इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी 15 रुपये प्लस जीएसटी चार्ज द्यावा लागेल. हे नियम 1 जुलैपासून लागू होतील. बेसिक सेव्हिंग खाते ते असते, ज्यांना आरबीआयच्या नियमानुसार अनेक प्रकारची सूट असते. हे एक झिरो बॅलन्स अकाऊंट असते, जे कुणीही उघडू शकते. यामध्ये मिनिमम बॅलन्स ठेवण्याची सक्ती नाही.