SBI च्या कोट्यवधी कर्जदारांसाठी महत्वाची बातमी ! ‘लॉकडाऊन’मध्ये फक्त एका SMS नं 3 महिन्यांपर्यंत रोखू शकता EMI, जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे धोक्यात आलेली अर्थव्यवस्था पाहता रिझर्व्ह बँकेने रिटेल लोनचे ईएमआय भरण्यावर 3 महीन्यांची आणखी मुदत दिली आहे. म्हणजे आता आता तुम्हाला होम लोन किंवा ऑटो लोनचा ईएमआय 3 महिन्यांपर्यंत आणखी रोखण्याचा पर्याय मिळाला आहे. एकुण आरबीआयने लोन मोरेटोरियम पीरियड 6 महीन्यांचा मार्च ते ऑगस्टपर्यंत केला आहे. लॉकडाऊनदरम्यान पैशांच्या तंगीला तोंड देणार्‍या मध्यमवर्गीयांना आणि व्यापार्‍यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आता या निर्णयानुसार देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) सर्व ग्राहकांचे लोन मोरेटोरियमला तीन महिन्यांनी आणखी वाढवले आहे.

एसबीआयने सांगितले की, त्यांनी सर्व योग्य लोन ग्राहकांकडून त्यांचे जून, जुलै आणि ऑगस्ट 2020 मध्ये येणारे ईएमआयवर स्टँडिंग इंस्ट्रक्शन/ एनएसीएच मँडेटला रोखण्यासाठी सहमती प्राप्त करण्यासाठी संपर्क केला आहे. यासाठी बँकेने ईएमआय रोखण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. जर तुम्हाला ईएमआय टाळायचा असेल, तर तुम्हाला बँकेकडून पाठवण्यात आलेल्या एसएमएसमध्ये दिलेल्या वर्चुअल मोबाइल नंबरवर यस लिहून उत्तर द्यावे लागेल. हा एसएमएस मिळाल्यानंतर पाच दिवसाच्या आत ही प्रक्रिया करावी लागेल.

काय आहे मोरेटोरियम
मोरेटोरियम त्या कालावधीला म्हणतात ज्या दरम्यान तुम्हाला घेतलेल्या कर्जावर ईएमआय भरावे लागतात. यास ईएमआय हॉलीडे सुद्धा म्हटले जाते. मात्र, येथे केवळ ईएमआय टाळण्याचा विकल्प आहे. याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमच्या ईएमआयचे 6 हप्ते कमी द्यायचेत. यापूर्वी सुद्धा आरबीआयने म्हटले होते की, ग्राहकांना कोरोना व्हायरसमुळे बिघडलेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी समर्थ बनवण्यासाठी हा दिलासा दिला आहे.