महत्वाचं ! SBI ने FD असणार्‍या ग्राहकांसाठी केली ‘ही’ सुविधा सुरू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये खाते धारकांसाठी ही बातमी महत्त्वाची असू शकते. त्यांच्या अनेक खाते धारकांची बँकेत एफडी असेल त्यांना या बातमीचा फायदाच होऊ शकतो. कारण बँक आपल्या ग्राहकांना एफडी संबंधी विशेष सुविधा पुरवत आहे.

कोणताही ग्राहक आता होम शाखे व्यतिरिक्त इतर कोणत्याही शाखेत फॉर्म १५ जी / १५ एच सादर करू शकतो, हे सर्वांना माहित आहे. बँकेतील एफडीवर व्याज मिळते म्हणूनच लोक एफडी करतात. मात्र एफडी वर येणाऱ्या व्याजावर कर कापला जातो. दरवर्षी ५० हजारांपर्यंत व्याज मिळत असेल तरच ही टीडीएस कपात होते. तसंच आपण घरबसल्या १५ जी आणि १५ एच फॉर्म देखील भरू शकता.

१५ जी आणि १५ एच फॉर्म म्हणजे नेमक काय प्रकार आहे, हेच अनेकांना माहित नसते. कर तज्ञांनुसार हे असे फॉर्म आहेत जे आपण आपल्या बँकेत जमा करतो. ज्याने आपल्या एकूण उत्पन्नावर कर द्यावा लागत नसेल तर तुमचा टीडीएस कापला जात नाही. हा फॉर्म दर वर्षी सादर केला जाऊ शकतो.

हा फॉर्म भरण्याचे काही नियम आहेत. जर आर्थिक वर्षात मिळणारे व्याज हे निश्चित केलेल्या रकमेपेक्षा जास्त असल्यास बँकेकडून टीडीएस कापला जातो. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये ही रक्कम १० हजार होती. तर वरिष्ठ नागरिकांसाठी ही रक्कम ५० हजार होती. मात्र या वर्षात ही रक्कम ४० हजार आणि वरिष्ठ नागरिकांसाठी ५० हजार ठेवण्यात आली आहे.

घरबसल्या १५ जी आणि १५ एच चा फॉर्म तुम्ही असा भरू शकता
१. पहिल्यांदा e-Services वर क्लिक करा.

२. स्क्रीनच्या डाव्या बाजूला Submit 15G/H चा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा.

३. त्यातील १५ जी आणि १४ एच वर क्लिक करा

४. CIF नंबर सिलेक्ट करून Submit बटन दाबा. आणि बँकेची शाखा निवडून Submit बटनावर क्लीक करा.

५. आता तुमच्या समोर फॉर्म येईल त्यावर नाव, असेसमेंट वर्ष, वार्षिक उत्पन्न अशी सर्व माहिती टाका.

६. डिक्लरेशन एक्सेप्टन्स सिलेक्ट करून ते Submit करा.

७. त्यानंतर १५जी आणि १५एफ व्हेरिफिकेशन जनरेट होईल. ते कम्फर्म करावे.

८. यानंतर मोबाईलवर SMS येईल. त्यानंतर हाई-सिक्यॉरिटी पासवर्ड टाकावा.

९. आपला फॉर्म जनरेट झाल्यानंतर तो Submit करा. तसंच या फॉर्मची एक कॉपी डाउनलोड करून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा.

आरोग्यविषयक वृत्त 

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा