SBI ग्राहकांसाठी तीन बातम्या ! दोन दिलासादायक, एक खिशाला कात्री लावणारी

नवी दिल्ली – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी दोन दिलासादायक बातम्या समोर आल्या आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर अकाऊंट ऑफ इंडिया ICAI ने पीपीएफची वार्षिक ठेव तीन लाखांपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे. आपल्या मागणीमध्ये, ICAI ने म्हटले आहे की PPF ची कमाल ठेव रकमेची मर्यादा वाढवणे आवश्यक आहे. (SBI)

 

कारण सेल्फ-अप्लाईड लोकांसाठी ही एकमेव बचत योजना आहे, जी सुरक्षिततेबरोबरच कराचाही लाभ देते. त्याचवेळी, आरबीआयकडून सांगण्यात आले की, एसबीआयसह आयसीआयसीआय आणि एचडीएफसीसारख्या बँका आता बुडण्याची शक्यता नाही. याशिवाय SBI ग्राहकांना धक्का देणारी बातमी, आता SBI ब्रँचमध्ये IMPS वर Rs 20+ GST लागणार आहे.

 

पीपीएफची मर्यादा वाढवण्याची मागणी

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया (ICAI) ने PPF ची कमाल वार्षिक ठेव मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. अनेक वर्षांपासून पीपीएफच्या कमाल ठेव मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

 

ICAI चे म्हणणे आहे की PPF ठेव मर्यादेत वाढ केल्याने GDP च्या टक्केवारीनुसार घरगुती बचतीला चालना मिळेल आणि त्याचा महागाईविरोधी प्रभाव पडेल. ICAI ने म्हटले आहे की PPF योगदानाची मर्यादा 3 लाख रुपयांपर्यंत वाढवावी. सध्या ही मर्यादा दीड लाख रुपये आहे.

 

SBI, ICICI आणि HDFC बँक बुडण्याची शक्यता नाही : RBI

मंगळवारी माहिती देताना ICICI ने सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील SBI बँक, खाजगी क्षेत्रातील ICICI बँक आणि HDFC बँक (D-SBI) किंवा संस्था कायम राहतील. त्यांना अपयश आल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल.

 

SIB ला बँकेला ’टू बिग टू फेल (TBTF)’ मानले जाते. TBTF ची ही संकल्पना
संकटकाळी या बँकांना सरकारी मदतीची अपेक्षा निर्माण करते.
या गृहीतकेमुळे, कर्जदारांना फंडिंग मार्केटमध्ये काही फायदे मिळतात.

 

भारतीय रिझर्व्ह बँकेने 2015 आणि 2016 मध्ये SBI आणि ICICI बँक यांना D-SIB म्हणून घोषित केले होते.
31 मार्च 2017 पर्यंत बँकांकडून गोळा केलेल्या डेटाच्या आधारे, HDFC बँकेला देखील D-SIB म्हणून ठेवण्यात आले होते.
यामुळे त्यांची अयशस्वी होण्याची शक्यता कमी आहे.

 

2 ते 5 लाख दरम्यान नवीन पेमेंट सर्व्हिस स्लॅब

भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने जाहीर केले आहे
की 2 लाख ते 5 लाख रुपयांच्या व्यवहारांसाठी नवीन तात्काळ पेमेंट सेवा (IMPS) स्लॅब सादर केला आहे.
बँकेने सांगितले की IMPS द्वारे 2 लाख ते 5 लाख रुपयांच्या रकमेवर 1 फेब्रुवारी 2022 पासून 20 रुपये अधिक GST लागू होईल.
एसबीआयच्या प्रत्येक शाखेत IMPS मर्यादा वाढवली जाईल.

 

Web Title :- SBI | three news for sbi customers two relief and third in problem

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा