SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर ! बँकेकडून 10 लाख योनो कॅश पॉईंट, ‘हे’ फायदे देखील मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक असलेली एसबीआय लवकरच देशभरात 10 लाख योनो कॅश पॉईंट बनविणार असून या योनो पॉइंट्सद्वारे तुम्ही एटीएममधून पैसे काढणे किंवा दुकानातून सामान खरेदी करण्यासारखी कामे करू शकता. त्याचबरोबर याआधी बँकेने अशा 68,000 योनो कॅशपॉईंटची स्थापना केली असून आणखी 10 लाख पॉइंट्सची स्थापना करण्यात येणार आहे. पुढील 18 महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होणार असून याबाबत स्टेट बँकेचे चेअरमन रजनीश कुमार यांनी मुंबईत माहिती दिली आहे.

68,000 योनो कॅशपॉईंट लावण्यात आले आहेत

याविषयी त्यांनी सांगितले कि, मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर माहिती फिरत आहे कि, एसबीआय डेबिट कार्ड बंद करणार आहे. मात्र सध्या अशी कोणतीही यॊजना नसून आम्ही डेबिट कार्ड हि संकल्पना बंद करण्यावर काम करत असून आम्हाला आशा आहे कि, आम्ही यामध्ये यशस्वी होऊ. त्यांनी सांगितले कि, संपूर्ण देशभरात 90 कोटी डेबिट कार्ड असून तीन कोटी क्रेडिट कार्ड आहेत. त्यामुळे आम्ही डेबिट कार्ड मुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर आम्ही संपूर्ण देशभरात 70,000 योनो कॅशपॉईंट बसवले असून याद्वारे तुम्ही विविध प्रकारच्या सेवेचा लाभ घेऊ शकता.

दोन प्रकारचे गृहकर्ज मिळणार आहे

कुमार यांनी याविषयी बोलताना सांगितले कि, बँक लवकरच आपल्या ग्राहकांसाठी रेपो रेट बरोबर जोडलेल्या गृहकर्जाची योजना देखील आणणार असून यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. रेपो रेटला जोडलेल्या कर्जाचे व्याजदर 8.05 टक्के असून नियमित व्याजदर हे 8.35 टक्के आहे. त्यामुळे आता ग्राहक यामुळे दोन योजनांपैकी कोणत्याही एका योजनेत कर्ज घ्यायचे आहे.

कृषी क्षेत्रावर बँकेचा जोर

यावेळी बोलताना कुमार म्हणाले कि, कृषी क्षेत्राला व्यवसाय क्षेत्राबरोबर आणण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार आहेत. सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले तरीदेखील शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधार झाला नसून यामध्ये शेतकऱ्यांना सक्षम बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करणे गरजेचे असून योनो ऍपच्या माध्यमातून शेतकरी खतखरेदी, बियाणे खरेदी त्याचबरोबर शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांची खरेदी करू शकणार आहेत.

You might also like