SBI ग्राहकांसाठी महत्वाची सूचना ! 30 सप्टेंबरपर्यंत करा ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकते तुमचे अकाऊंट
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – SBI News |भारतीय स्टेट बँक (State Bank of India) ने आपल्या ग्राहकांना एक नोटीस जारी केली आहे. बँकेने खातेधारकांना म्हटले आहे की, लवकरात लवकर PAN-Aadhaar card 30 सप्टेंबरपर्यंत लिंक करा. जर हे काम ठरलेल्या कालावधीत झाले नाही तर बँकिंग सेवा बाधित होऊ शकते. भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या official website वर ही माहिती दिली आहे.
सोबतच बँकेने म्हटले आहे की, जर आधार आणि पॅन एकावेळी लिंक केले नाही तर पॅन नंबर निष्क्रिय होईल. तसेच 30 सप्टेंबरपर्यंत आपले KYC केले नाही तरी बँक अकाऊंट सस्पेंड होऊ शकते. बँक अकाऊंटशी पॅन आणि आधार कार्ड लिंक असेल तर पुन्हा आधार आणि PAN पाठवण्याची आवश्यकता नाही.
पॅन आणि आधार लिंक करण्याची प्रक्रिया
1. यासाठी पहिली पद्धत SMS आणि दुसरी इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जाऊन करू शकता.
2. एसएमएसद्वारे पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी UIDPAN < स्पेस 12 अंकी आधार नंबर < स्पेस10 अंकी पॅन नंबर आणि 567678 किंवा 56161 वर एसएमएस करा.
Web Title :- sbi told its customers do this work by 30th september otherwise your account may be closed
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update