कमी गुंतवणुकीत जास्त पैसे कमावण्याचे ‘हे’ आहेत ‘हीट फॉर्मुले’ ! निवडा ‘SBI’ Vs ‘पोस्ट ऑफिस’ चा पर्याय, जाणून घ्या
पोलीसनामा ऑनलाइन टीम – दीर्घ गुंतवणूकीसाठी रिकरिंग डिपॉझिट हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला बँक बचत ठेवींपेक्षा रिकरिंग डिपॉझिट (RD) वर जास्त व्याज मिळते. ही एक प्रकारची बँकेतील मुदत ठेव आहे. रिकरिंग डिपॉझिटच्या मदतीने तुम्ही दरमहा बचत हप्ते जमा करून काही महिन्यांत निश्चित रकमेची बचत करु शकता. तथापि एकदा आपण हप्त्याची रक्कम निश्चित केल्यावर त्यात बदल करू शकत नाही. आपण बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आवर्ती ठेव (RD) उघडू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस ग्राहकांना आवर्ती ठेवीचा पर्याय देतात. आम्ही तुम्हाला दोनही ठिकाणच्या ठेवींमधील तुलनात्मक फरक याठिकाणी देत आहोत. आता तुम्ही ठरवा तुम्हाला कुठे अकाउंट उघडायचंय.
१) गेल्या महिन्याच्या दहा तारखेलाच एसबीआयने आवर्ती ठेवीवरील (RD) व्याज दर कमी केला. सर्वसामान्यांसाठी आवर्ती ठेवीवर एसबीआय ५.८० ते ६.२५ टक्के दराने व्याज देते. त्याचवेळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरडी व्याजदरामध्ये ५० बेस पॉईंट्सने वाढ होते. एसबीआयच्या तुलनेत पोस्ट ऑफिस रिचार्जिंग ठेवीवर वार्षिक ७.२ व्याज मिळते.
२) एसबीआयच्या रिकरिंग डिपॉझिटचा मॅच्युरिटी कालावधी १ वर्षापासून १० वर्षांपर्यंत असतो. त्याच वेळी, पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेवीवर मात्र ५ वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी असतो.
३) एसबीआयमध्ये तुम्ही फक्त रोख रक्कम किंवा चेकच्या मदतीने आरडी खाते उघडू शकता, परंतु पोस्ट ऑफिससाठी तुम्हाला फक्त रोख रक्कम जमा करावी लागेल.
४) नेट बँकिंगद्वारे आपण एसबीआयकडे आरडी खाते उघडू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये आरडी खाते उघडण्यासाठी मात्र तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या शाखेतच जावे लागेल.
५) एसबीआय आरडी खात्यात ग्राहकांना दरमहा किमान १०० रुपये गुंतवावे लागतात. हे १० रुपयांच्या पटीत असू शकते. यासाठी कोणतीही मर्यादा नाही. परंतु, पोस्ट ऑफिसच्या आरडीसाठी आपण किमान १० रुपयांपासून देखील प्रारंभ करू शकता. त्यात गुंतवणूक करण्याची कोणतीही मर्यादा नाही.
६) ५ वर्षात, सरकार पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटवर मिळणारा व्याज दर ठरवते. एसबीआयचा व्याज दर मात्र वेळोवेळी बदलत असतो. आजकाल, बँका निश्चित वेळेत त्या सुधारित करतात. विशेषत: रिझर्व्ह बँकेने पॉलिसी दारात बदल केल्यानंतर यात बदल होत असतो.
Visit : Policenama.com
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर