SBI ग्राहकांनी व्हावे सावध! PAN Card च्या डिटेल अपडेट करण्यासाठी पाठवला जातोय Fake SMS, करू नका क्लिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI | सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. स्कॅमर्स निष्पाप लोकांना फसवून त्यांचे कष्टाचे पैसे चोरण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत. लोकांची फसवणूक करण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे टेक्स्ट किंवा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज. आता एक नवीन प्रकरण समोर आले आहे ज्यात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या नावाखाली स्कॅमर्स लोकांना बळी बनवत आहेत. हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि ते कसे टाळावे ते जाणून घेवूयात…

 

मेसेजमध्ये, स्कॅमर वापरकर्त्यांना पॅन कार्ड तपशील अपडेट करण्यास सांगत आहेत.
पीआयबी फॅक्ट-चेक टीमला नुकतेच आढळले की स्कॅमर एसबीआय खातेधारकांना टेक्स्ट मेसेज पाठवत आहेत. मेसेजमध्ये, स्कॅमर ग्राहकांना त्यांचे डइख धजछज खाते अपडेट आणि पुन्हा सक्रिय करण्यासाठी त्यांचे पॅन कार्ड तपशील अपडेट करण्यास सांगत आहेत. यानंतर पीआयबीने एसबीआय ग्राहकांना तात्काळ इशारा जारी केला आहे. (SBI)

 

SBI YONO खाते बंद झाल्याचा मेसेज
अनेक एसबीआय बँक खातेधारकांना त्यांचे योनो खाते निष्क्रिय करण्यात आले आहे आणि खाते पुन्हा सक्रिय करण्यासाठी पॅन अपडेट करणे आवश्यक आहे असा टेक्स्ट मेसेज प्राप्त झाला आहे. या मेसेजमध्ये एक लिंक समाविष्ट आहे, ज्यावर क्लिक केल्याने हॅकर्सना युजर्सचे वैयक्तिक तपशील अ‍ॅक्सेस करण्यात मदत होते.

 

प्रिय ग्राहक, तुमचे SBI YONO खाते बंद झाले आहे, आता संपर्क करा आणि दिलेल्या लिंकमध्ये तुमचा पॅन क्रमांक अपडेट करा. वास्तविक, पाठवणार्‍याचे नावही टेक्स्ट मेसेजमध्ये समाविष्ट होते. अशावेळी एसबीआयच्या नावाने असाच मेसेज आला असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. हा मेसेज फेक आहे.

 

ताज्या ट्विटमध्ये, पीआयबी फॅक्ट चेकने एसबीआय ग्राहकांना या बनावट संदेशाबद्दल सावध केले आहे
आणि त्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. तुमचे वैयक्तिक आणि इतर तपशील कोणाशीही शेअर करू नका.
अशा ईमेल/एसएमएसला उत्तर देऊ नका जे तुम्हाला फेक वाटतील.

फेक एसबीआय मेसेजची तक्रार कशी करावी
जर तुम्हाला तुमच्या एसबीआय खात्याशी संबंधित कोणताही मेसेज आला असेल
आणि तुम्हाला तो फेक वाटत असेल तर तुम्ही त्या मेसेजची तक्रार करा.
मेसेजची तक्रार करण्यासाठी, [email protected] वर ईमेल लिहू शकता किंवा हेल्पलाइन नंबर – 1930 वर कॉल करू शकता.

 

Web Title :- SBI | warning for sbi users message asking you to update pan card details is fake do not fall in this new scam

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | गोळीबार करुन 3.5 कोटी लुणाऱ्या टोळीचा ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश, 1.43 कोटी रुपये जप्त

 

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात आगमन

 

e-Search Report Maharashtra | ऑनलाइन मिळकतींचा शोध (ई-सर्च रिपोर्ट) घेण्याची सुविधा पुन्हा सुरू