SBI नं 40 कोटी ग्राहकांना केलं अलर्ट ! बँक अकाऊंटमधून नव्या पध्दतीनं होतेय पैशांची चोरी..

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या 44 कोटी खातेदारांना सायबर क्राईमबद्दल सतर्क केले आहे. एसबीआयने मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरवर पोस्ट करुन म्हटले आहे की, फसवणूक करणारे नवीन पद्धती आणि तंत्रज्ञानाने ग्राहकांना फसवत आहेत. भारतात नव्या मार्गाने लोकांची फसवणूक केली जात आहे. बँकांनी ग्राहकांना ओटीपी आणि पिन सारखी संवेदनशील माहिती देऊ नका, अशी विनंती केली आहे.

एसएमएसद्वारे लोकांना फसविले जात आहे
एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, फसवणूक करणारे लोक ग्राहकांना एसएमएस पाठवत आहेत. या एसएमएसमध्ये एसबीआय नेटबँकिंग पेजसारखे दिसणारे पेज पाठविले जात आहेत. आपल्याला असा एसएमएस आल्यास तो त्वरित डिलीट करावा http://www.onlinesbi.digital ही एक बनावट वेबसाइट आहे.

या सुरक्षा टिप फॉलो करा-
1.  कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन परिस्थितीत फसवणूक करणारेही सक्रिय झाले असून यूपीआय आयडीमधून देणगी मागत आहे. बँक म्हणाले, फसव्या यूपीआय आयडींकडून देणगी मागणाऱ्यांपासून सावध रहा. आपल्या कष्टाने मिळवलेले पैसे देण्यापूर्वी विचार करा.

2 .  निधी हस्तांतरित करण्यापूर्वी पैसे घेणार्‍याची ओळख तपासा.

3 .  कोणत्याही ई-कॉमर्स साइटवर तुमच्या कार्डचा तपशील कधीही सेव्ह करु नका.

4 . अनावश्यक ईमेलवर आपली संवेदनशील माहिती देऊ नका.

5 .  कोरोना विषाणूशी संबंधित कोणतीही बातमी त्यावर क्लिक करण्यापूर्वी तपासा.

6 .  जेव्हा आपल्याला असा कॉल आला तर त्वरित तक्रार करा.