SBI ने केले ग्राहकांना अलर्ट ! मोबाईलवर ‘हा’ SMS आला तर सर्वात आधी करा ‘हे’ काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाकडून UPI च्या 44 कोटींपेक्षा अधिक असणाऱ्या ग्राहकांना फसवणुकीचा इशारा देण्यात आला आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा इशारा दिला आहे. UPI मार्फत खात्यातून पैसे डेबिट करण्याचा एसएमएस अलर्ट तुम्हाला मिळाला नसेल तर वेळीच सावध व्हा असे बँकेकडून सांगण्यात आले आहे. SBI च्या सूचनांचे पालन करा आणि सावधगिरी बाळगा. एसबीआयकडून ट्विट करून आपल्या ग्राहकांना सावध करण्यात आले आहे.

बँकेकडून काय सांगण्यात आले

जर तुम्ही UPI व्यवहार केला नसेल आणि पैशांच्या डेबिटसाठी तुम्हाला एसएमएस मिळाला असेल तर आधी तुम्ही UPI सेवा बंद करा. UPI सेवा बंद करण्यासंबंधी बँकेकडून माहिती देण्यात आली आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या प्रमाणात वाढ होत असताना एसबीआयकडून वेळोवेळी ग्राहकांना सावधानतेचा इशारा देते. या अगोदर बँकेकडून त्वरित कर्ज अ‍ॅपसंदर्भात सावध करण्यात आले होते. कोणतीही कागदपत्रं न घेता आपल्याला फक्त दोन मिनिटांत कर्ज उपलब्ध करून देण्याचा दावा करणाऱ्या अ‍ॅपपासून सावध राहण्याचा इशारा दिला होता. बरेच लोक या अ‍ॅपच्या माध्यमातून कर्ज घेतात आणि त्यानंतर त्यांना जास्त व्याजदर भरावा लागतो.

UPI सेवा बंद करावी

बँकेकडून UPI सेवा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टोल फ्री हेल्पलाईन नंबर १८००११११०९ वर कॉल करून ग्राहक यूपीआय सेवा थांबवू शकतात किंवा आपण आयव्हीआर नंबर १८००- ४२५- ३८०० / १८०० – ११- २२११ वर देखील कॉल करू शकता.या व्यतिरिक्त ग्राहक https://cms.onlinesbi.sbi.com/cms/ या वेबसाईटवर आपली तक्रार नोंदवू शकतात. साईटवर दिलेल्या ९२२३००८३३३ या क्रमांकावर देखील तुम्ही एसएमएस पाठवू शकता.