SBI यूजर्सने व्हावे सावध, फोनवर आलेला हा मॅसेज किंवा ईमेल रिकामे करू शकतो तुमचे बँक अकाऊंट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ऑनलाइन फसवणूक करणारे हॅकर्स विविध प्रकारे लोकांची फसवणूक करत आहेत. नेट बँकिंग आणि डिजिटल ट्रांजक्शन वाढल्याने ऑनलाइन फ्रॉडची प्रकरणे सुद्धा वाढली आहेत. आता ऑनलाइन फसवणुकीपासून आपल्या ग्राहकांना वाचवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने ग्राहकांना विनंती केली आहे की, त्यांनी फसवणुकीपासून सावध रहावे.

आपल्या ट्विटमध्ये एसबीआयने लिहिले आहे की, मीडिया रिपोर्टनुसार, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की, सायबर गुन्हेगार एसबीआय ग्राहकांना फोन नंबरवर रिवॉर्ड पॉईंटसाठी मॅसेज पाठवत आहेत. एसएमएसमध्ये ते एका लिंकवर क्लिक करून रिवॉर्ड पॉईंट कलेक्ट करण्यास सांगत आहेत आणि या बहाण्याने ते ग्राहकांचा संवेदनशील डेटा कलेक्ट करत आहेत.

कुणासोबतही शेयर करू नका आपली माहिती
बँकेने आपल्या ग्राहकांना सावध करताना म्हटले आहे की, त्यांनी कोणत्याही प्रकारची आपली संवेदनशील माहिती जसे की, डेबिट कार्ड नंबर, पिन, ओटीपी, सीव्हीव्ही आणि पासवर्डची माहिती कुणालाही देऊ नका. एसएमएस आणि ई-मेलद्वारे आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. बँक कधीही ग्राहकांकडे वैयक्तिक माहिती फोन, एसएमएस आणि ई-मेल द्वारे मागत नाही. यासाठी अशा लिंकपासून सावध रहा. फ्रॉड मॅसेजपासून सावध रहा. सतर्क रहा आणि सुरक्षित रहा.

या शहरातील लोक हॅकर्सच्या टार्गेटवर
हॅकर्सने अनेक यूजर्सना संशयीत टेक्स्ट मॅसेज पाठवून त्यांना 9,870 रुपयांच्या एसबीआय क्रेडिट पॉईंट रिडीम करण्याची विनंती केली. स्टेट बँकेनुसार हॅकर्सच्या निशाण्यावर विशेषकरून दिल्ली, मुंबई, हैद्राबाद, चेन्नई आणि अहमदाबादचे लोक आहेत. हॅकर्सकडून पाठवण्यात आलेल्या ई-मेलवर क्लिक केल्यास यूजर बनावट वेबसाइटवर पोहचतात. यानंतर या बनावट वेबसाइटवर खासगी किंवा बँक अकाऊंटची माहिती दिल्यास त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड पडू शकतो.