SBI कडून कोटयावधी ग्राहकांना निर्वाणीचा इशारा, ‘हा’ व्हिडीओ पहाल तर वाचाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण ऑनलाईन व्यवहार करण्यावर भर देत आहेत. मात्र, याचा फायदा ऑनलाईन घोटाळेबाज घेत आहेत. हे लोक बँक ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. ग्राहकांच्या बँक खात्याची माहिती चोरण्यासाठी नवनवीन फंडे अजमावत असून हजारात एकतरी त्यांच्या जाळ्यात सापडत आहे. कॉल करणे, एसएमएस करणे यासह लिंक पाठविणे असे हातखंडे ते वापरत आहेत. यावर SBI ने ग्राहकांना सावध राहण्यास सांगितले असून ऑनलाइन बँकिंग कसे सुरक्षित करावे याबाबत मार्गदर्शन केले आहे.


SBI ने आपल्या ट्विटर अकाउंटवर 45 सेकंदाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ऑनलाइन बँकिग कसे सुरक्षित करावे याबाबत सांगण्यात आले आहे. एसबीआय बँकेने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना यापूर्वी देखील सावधगिरीचे सल्ले दिले आहेत.

शेअर केलेल्या व्हिडीओत 3 वेगवेगळ्या वेळा दाखवण्यात आल्या आहेत
– जर तुम्हाला कोणताही फ्रॉड कॉल, ईमेल किंवा मेसेज आला तर त्यामध्ये तुमची माहिती किंवा अर्जंट पेमेंट करण्यास सांगितले जाते.
– तुमच्या बँक खात्यातून असे ट्रान्झॅक्शन होते, जे तुम्ही केलेलेच नसते.
– जर तुम्ही कोणासोबत तुमची खासगी माहिती किंवा खात्याशी संबंधित माहिती शेअर केली असेल.
SBI ने नेटबँकिंग वापरणाऱ्या आपल्या ग्राहकांना सल्ला दिला आहे की, बँकिंग सायबर फ्रॉडची तक्रार एकतर राष्ट्रीय सायबर गुन्हे यांच्या वेबसाईटवर किंवा पोलिसांकडे करावी.

सायबरकडे तक्रार https://cybercrime.gov.in या वेबसाईटवर करावी. याशिवाय देशातील सर्वात मोठ्या बँकेचे म्हणने आहे की, सायबर क्राईमच्या छोट्याशा घटनेकडेही दुर्लक्ष करू नका. कारण याचा पुढे मोठा फटका बसू शकतो.एसबीआने आपल्या ट्वीटमध्ये लिहले आहे की, सायबर क्रिमिनल्सपासून आपली सुरक्षा करा, अधिक माहितीसाठी https://bit.ly/3h0jWie या लिंकवर क्लिक करा.