SBI ने ग्राहकांना केले सावध ! लवकर करा ‘हे’ उपाय नाहीतर रिकामे होईल अकाउंट, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – जर तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल तर ही तुमच्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे, कारण आजकाल इंटरनेटवरून फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. लोकांची बँक अकाउंट रिकामी केली जात आहेत. त्यामुळे SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक ट्विट करून त्यांच्या करोडो ग्राहकांना अलर्ट केले आहे. यासोबत अशा धोक्यापासून वाचण्यासाठी उपाय सांगितले आहेत. फसवणूक करणारे यासाठी नव-नवीन पद्धती वापरून ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक करत आहेत.

SBI ने ट्विट करून दिली माहिती
SBI ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून सांगितले की कोणताही SMS, अँप अथवा मोबाईल नंबरवर पर्सनल डिटेल, आधार क्रमांक आणि ई-केवाइसी डिटेल शेर करू नका. SBI ने सांगितले आहे की ग्राहकांनी बँकेशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी त्यांच्या हेल्पलाईन क्रमांकाचा अथवा वेबसाईटचा वापर करावा.

जाणून घ्या काय आहे फिशिंग आणि यापासून कसे वाचू शकता तुम्ही

>> फिशिंग ऍक्टमध्ये ग्राहकांनी वयक्तिक ओळखीची माहिती आणि आर्थिक खात्यांची माहिती चोरण्यासाठी सोशल इंजिनियर आणि तांत्रिक फसवणूक दोन्हीचा वापर करतात.

>> इंटरनेट बँकिंग वापरकर्त्यांना फसवणुकीचा ई मेल मिळतो, जो मेल वैध इंटरनेट पट्ट्यावरून प्राप्त झाल्याचे कळते.

>> ई मेल वापरकर्त्यांना मेलमध्ये उपलब्ध असलेल्या हायपर लिंकवर क्लिक करण्यासाठी सांगितले जाते.

>> वापरकर्ते हायपर लिंकवर क्लिक करतात आणि एक खोटी वेबसाईट चालू होते, जी तुमच्या इंटरनेट बँकिंग सारखी असते.

>> सामान्यतः काही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ई मेलद्वारे बक्षीस देण्याची चेतावणी दिली जाते आणि प्रक्रिया पूर्ण न केल्यास दंड आकारला जातो.

>> वापरकर्त्यांना गोपनीय माहिती जसे की लॉगिन/प्रोफाइल किंवा व्यवहाराचा सांकेतिक शब्द आणि बँक खाते क्रमांक इ. प्रदान करण्यास सांगितले जाते.

>> वापरकर्ता सद्भावनेने माहिती प्रदान करतो आणि ‘सबमिट’ बटनावर क्लिक करतो.

>> वापरकर्त्यांना एरर पेज दिसू लागते.

>> वापरकर्ता फिशिंग फसवणुकीत अडकले जातात.

अशाप्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी काय करावे:

>> नेहमी ऍड्रेस बारवर युआरएल टाईप करून लॉग ऑन करा.

>> फक्त अधिकृत लॉगिन पेजवरच तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाका.

>> तुमचा युजर ID आणि पासवर्ड देण्याआधी हे निश्चित करून घ्या की लॉगिन पेजचा URL ‘https://’text यासोबत सुरु होईल आणि हा ‘http://’ नाही आहे. ‘S’ चा अर्थ ‘सुरक्षित’ आहे. जो संकेत देतो की वेब पेजमध्ये एन्क्रिप्शन वापरले गेले आहे.

>> नेहमी, ब्राऊझरच्या खाली उजवीकडे लॉक चिन्ह आणि सत्यापन प्रमाणपत्र शोधा.

>> फोन/इंटरनेटवर तुम्ही वयक्तिक माहिती फक्त तेव्हाच द्या, जेव्हा तुमचा कॉल अथवा सत्र सुरु केले आहे आणि समोरील व्यक्तीची खात्री केली गेली आहे.

>> कृपया हे लक्षात ठेवा की बँक कधीही ई मेलच्या माध्यमातून तुमच्या खात्याची माहिती विचारत नाही.