SBI करणार डेबिट कार्ड बंद, पैसे काढण्यासाठी आता वापरली जाणार ‘ही’ प्रणाली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात बँकिंग क्षेत्रात पैशांच्या व्यवहारासंदर्भात मोठे बदल होऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) येत्या काळात ‘डेबिट कार्ड’ सेवा बंद करण्याच्या योजनेवर काम करीत आहे. असे झाल्यास ‘योनो’ या डिजिटल पेमेंट प्रणालीचा वापर वाढवण्यावर एस बी आयचा भर असणार आहे.

देशात सध्या ९० कोटी डेबिट कार्ड आहेत त्यामुळे ही सेवा बंद करण्याची आमची योजना आहे अशी माहिती एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी एका कार्यक्रमात दिली. ते म्हणाले योनोच्या माध्यमातून एटीएम मशिन्समधून रोख रक्कम काढता येईल तसेच दुकानांमधून वस्तू देखील खरेदी करता येतील. बँकेने यापूर्वीच ६८,००० योनो कॅशपॉईंट इन्स्टॉल केले आहेत. त्यानंतर येत्या १८ महिन्यांत याची संख्या १० लखांपर्यंत वाढवण्याची एसबीआयची योजना आहे.

कशी आहे नेमकी ‘योनो’ प्रणाली –
याद्वारे ग्राहकांना आपल्या अकाऊंटमधून विना डेबिट कार्ड पैसे काढता येतात
डेबिट कार्ड पेक्षाही अधिक सोपी प्रणाली
योनो ची सुरक्षितता ही खूप जास्त

सुरुवातीला ही सुविधा १६,५०० एटीएममध्ये उपलब्ध होती, त्यानंतर आता बँक आपल्या सर्व एटीएममध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी काम सुरु असल्याची माहिती यावेळी रजनीश कुमार यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –