धक्कादायक ! SBI कडून 220 थकबाकीदारांचे 76600 कोटींचे कर्ज माफ, RTI मधून झाला खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने २२० थकबाकीदारांचे (डीफॉल्टर्स) ७६,००० कोटी रुपयांचे कर्ज बुडीत खात्यात टाकले आहे. यातील प्रत्येक थकबाकीदारांवर सुमारे १०० कोटींचे कर्ज आहे. एका वृत्तसंस्थेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI) कडून आरटीआयद्वारे बुडीत कर्जांविषयी माहिती मिळवली, ज्यात बँकांनी ३१ मार्च २०१९ पर्यंत १०० कोटी ते ५०० कोटी रुपयांचे बुडित कर्ज दिले आहे. प्राप्त माहितीनुसार, जवळपास सर्वच व्यापारी बँकांकडून १०० कोटी आणि त्यावरील थकबाकी बुडीत खात्यात टाकले आहे. ही रक्कम एकूण २.७५ लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे.

आरबीआयने ९८० खाती ओळखली :

ताज्या माहितीवरून असे दिसून आले आहे की ५०० कोटी आणि त्यापेक्षा जास्त लोकांना देण्यात आलेली एकूण ६७,६०० कोटी रुपयांची कर्जे थकलेली किंवा अडकलेली म्हणून घोषित करण्यात आली आहेत. आरबीआयने ९८० थकबाकीदारांची ओळख पटविली आहे ज्यांनी १०० कोटी आणि त्याहून अधिक कर्ज घेतले आहे आणि बँकांनी त्यांचे कर्ज बुडीत खात्यात टाकले आहे. यापैकी २२० खाती एसबीआयमध्ये आहेत. अशा प्रत्येक खात्यात सरासरी ३४८ कोटी रुपये माफ केले गेले आहेत.

डीफॉल्ट खात्यांमध्ये पीएनबी दुसर्‍या स्थानावर :

५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या ७१ खात्यांपैकी एसबीआयचा ३३-४४ टक्के वाटा आहे. त्याचप्रमाणे पंजाब नॅशनल बँकेनेही १०० कोटींपेक्षा जास्त कर्ज घेतलेल्या ९४ खातेदारांची कर्जे माफ केली आहेत. बुडीत खात्यातील पीएनबीची एकूण रक्कम २७,०२४ कोटी रुपये आहे. यानुसार प्रत्येक खात्यासाठी सरासरी २८७ कोटी रुपये माफ केले गेले आहेत. ५०० कोटींपेक्षा जास्त कर्ज घेतलेल्या १२ सर्वात मोठ्या थकबाकीदारांचे पीएनबीने ९,०३७ कोटी रुपये माफ केले आहेत.

खासगी बँकांच्या यादीमध्ये IDBI, कॅनरा बँक अव्वल :

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये एसबीआय आणि पीएनबी पहिल्या क्रमांकावर आहेत तर खासगी बँकांमध्ये आयडीबीआय अव्वल आहे. आयडीबीआय ही बँकांमध्ये १०० कोटी आणि त्याहून अधिक कर्ज बुडीत खात्यात टाकणारी तिसरी क्रमांकाची व्यावसायिक बँक आहे. आयडीबीआय बँकेमध्ये ७१ थकबाकीदार होते ज्यांनी १०० कोटींपेक्षा जास्त कर्ज घेतले आणि त्यांनी एकूण २६,२१९ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कॅनरा बँकेत १०० कोटींपेक्षा जास्त कर्ज घेणार्‍या ग्राहकांची संख्या ६३ होती. कॅनरा बँकेत ७ कर्जदार आहेत ज्यांनी ५०० कोटींहून अधिक कर्ज घेतले आहे. त्यांनी एकूण २७,३८२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.

visit : policenama.com