SBI च्या Yono मर्चंट App चा 2 कोटी वापरकर्त्यांना होणार फायदा, जाणून घ्या कसे करणार काम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी सरकारी स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) सहाय्यक एसबीआय पेमेंट्स लवकरच रिटेल आणि औद्योगिक क्षेत्रातील कोट्यावधी व्यावसायिकांना मदत करण्यासाठी योनो मर्चंट ॲप (SBI YONO Merchant App) आणणार आहे. एसबीआयच्या नव्या प्लॅटफॉर्मच्या मदतीने व्यवसायीक मोबाइल आधारित तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल पेमेंट घेण्यास सक्षम असतील. यासंबंधित पायाभूत सुविधांना बळकट करण्यासाठी एसबीआय पेमेंट्सने व्हिसा सोबत हात मिळवणी केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या घोषणेच्या आधारे ही सुविधा सुरू केली जात असल्याचे एसबीआयने म्हटले आहे.

पेमेंट स्वीकारण्याबरोबरच व्यापाऱ्यांना मिळणार बर्‍याच सुविधा
एसबीआय म्हणाले, ‘आरबीआयने अलीकडेच म्हटले की देशाच्या अंतर्गत भागात पॉईंट ऑफ सेल (पीओएस) पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (PIDF) तयार केला जात आहे. हे लक्षात घेऊन आता एसबीआयने योनो मर्चेंट अ‍ॅप सुरू करण्याच्या योजनेच्या कामास गती दिली आहे. या अ‍ॅपच्या मदतीने, व्यापारी केवळ पेमेंट स्वीकारण्यास सक्षम नसून व्यवहाराचा तपशील, अहवाल तयार करणे यासारख्या गोष्टी सहजपणे करण्यास सक्षम असतील. त्याच वेळी, व्यवहार प्रक्रिया करण्यासाठी योनो मर्चेंट अ‍ॅपद्वारे माहिती अपलोड करण्यात देखील सक्षम असतील.

20 कोटी व्यावसायिकांना फायदा
पुढील 2 वर्षात देशातील सर्वात मोठ्या बँकेची कमी किमतीच्या पेमेंट्सची पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याची योजना आहे. याचा देशातील 20 कोटी व्यावसायिकांना फायदा होईल, असा बँकेचा दावा आहे. एसबीआयने म्हंटले की, आता बहुतेक ग्राहक आणि व्यापारी ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य देत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू ठेवण्यासाठी अखंडित सुरक्षित सुविधा सुनिश्चित करू. तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या योनो प्लॅटफॉर्मवर सध्या 3.58 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. एसबीआयचे अध्यक्ष दिनेशकुमार खारा म्हणाले की, योनो ​​मर्चंटचा हा विस्तार असेल. आमच्या व्यावसायिक वापरकर्त्यांच्या सोयीसाठी हे ऑफर केले जात आहे.

व्यापार्‍यांच्या मोबाइल फोनला पीओएसमध्ये करणार अपग्रेड
खारा म्हणाले की, येत्या 2-3 वर्षांत आम्ही आमच्या कोट्यावधी व्यापाऱ्यांचे मोबाइल फोन पीओएस उपकरणांमध्ये अपग्रेड करू. एवढेच नाही तर त्यांना एका क्लिकवर बँकेच्या इतर सुविधा देखील मिळतील. आमचे मर्चंट टच पॉईंट 2 ते 3 वर्षात 50 लाखांवरून 1 कोटी पर्यंत वाढवण्याचे आमचे लक्ष्य आहे.

एसबीआय पेमेंट्सचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गिरी कुमार नायर म्हणाले की, योनो एसबीआय मर्चंट अ‍ॅप किरकोळ आणि उद्योजकांना अधिक चांगला अनुभव प्रदान करेल. योनो मर्चंट अ‍ॅप देशातील व्यावसायिकांच्या डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देईल. एसबीआयने उत्तर-पूर्व शहरांसह तीन आणि चार शहरांमध्ये डिजिटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर वाढविण्यात मदत होईल असे एसबीआयने म्हटले आहे. योनो मर्चंट अ‍ॅप सॉफ्ट पॉस (पॉईंट ऑफ सेल) सोल्यूशन म्हणून कार्य करेल.