SBI Yono द्वारे आता घरबसल्या मिळेल 35 लाखापर्यंत Personal Loan, या ग्राहकांसाठी विशेष सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Yono | स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने सोमवारी त्यांच्या YONO प्लॅटफॉर्म (SBI Yono Platform) वर रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट (Real Time Xpress Credit) ची सुरूवात करण्याची घोषणा केली (SBI Yono). बँकेचे पात्र ग्राहक 35 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (Loan) मिळवण्यासाठी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात (SBI Xpress Credit News).

 

फ्लॅगशिप प्रॉडक्ट डिजिटल स्वरूपात लाँच
बँकेने म्हटले आहे की, पगारदार लोकांसाठी वैयक्तिक कर्जाशी संबंधित त्यांच प्रमुख प्रॉडक्ट Xpress Credit डिजिटल स्वरूपात लाँच केले गेले आहे आणि ग्राहक Yono द्वारे या उत्पादनाचा लाभ घेऊ शकतात. बँकेच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण प्रक्रिया 100% पेपरलेस असेल आणि या प्रक्रियेत सर्व काही डिजिटल पद्धतीने केले जाईल. यासोबतच आठ स्टेप्स एंड-टू-एंड असतील.

 

या लोकांना बँकेत जाण्याची नाही गरज
एसबीआयने सांगितले आहे की रियल टाइम एक्सप्रेस क्रेडिट अंतर्गत, केंद्र, राज्य सरकारी कर्मचारी आणि डिफेन्स सेक्टरच्या पगारदार ग्राहकांना आता वैयक्तिक कर्ज (SBI Personal Loan) घेण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची आवश्यकता नाही. बँकेच्या म्हणण्यानुसार, क्रेडिट चेक, एलिजिबिलिटी चेक, लोन सँक्शन आणि डॉक्युमेंटेशन आता रिअल टाइममध्ये डिजिटल पद्धतीने होईल. (Personal Loan On SBI Yono)

एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, योनोवरील आमच्या पात्र पगारदार ग्राहकांसाठी रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट लोन सुविधा सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. एक्सप्रेस क्रेडिट प्रॉडक्टद्वारे, आमच्या ग्राहकांना डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे त्रास-मुक्त पेपरलेस कर्ज प्रक्रियेची सुविधा मिळते.

 

एसबीआयच्या या विशेष सुविधेमुळे पगारदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे कारण गरज पडल्यास ते
घरी बसून कर्ज घेऊ शकतील. दुसरीकडे, पेपरलेस प्रक्रिया देखील या प्रॉडक्टला विशेष बनवते.

 

Web Title :- sbi real time xpress credit on yono platform get personal loan up to rs 35 lacs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Development Plan For The Merged 23 Villages | पुणे महापालिका समाविष्ट २३ गावांमध्ये ड्रेनेज लाईनच्या कामासाठी सल्लागार नेमणार

 

ACB Trap Pune | लाच मागणाऱ्या पोलीस हवालदार व होमगार्डवर पुणे एसीबीकडून गुन्हा दाखल

 

Latur News | लातूर जिल्ह्यातील घटना ! लग्नसमारंभात सुमारे 250 जणांना विषबाधा, वेळीच उपचार केल्याने धोका टळला