ATM कार्ड हरवलं, चिंता नको ; अवघ्या काही सेकंदात कार्ड ‘असं’ ब्लॉक करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्राहकांचा बँक शाखांमध्ये येणारा ओघ कमी करण्यासाठी बँकांनी विविध प्रकराच्या सुविधा आणि सेवा ‘एटीएम’मार्फत उपलब्ध करून दिल्या आहेत. एटीएम हरवणे किंवा चोरीला जाणे ही सामान्य गोष्ट बनली आहे. मात्र एटीएम हरवले किंवा चोरीला गेले तर आपले मोठे नुकसान होऊ शकते. जर तुम्ही SBI चे ग्राहक आहात आणि तुमचे एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर तुम्ही मॅसेज , ऑनलाइन बँकिंग , एसबीआय अ‍ॅप किंवा कस्टमर केयरला कॉल करून तात्काळ कार्ड ब्लॉक करू शकता. खालील पद्धतींनी SBI कार्ड करा ‘ब्लॉक’

ऑनलाइन पद्धतीने कार्ड ब्लॉक करा –

Onlinesbi.com वर यूजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. e-Services या टॅब वर जा त्यानंतर एटीएम कार्ड सेवांमध्ये ब्लॉक ऑप्शनवर क्लीक करा. जर SBI मध्ये एकापेक्षा अधिक खाते असल्यास तेच खाते निवड जे एटीएम कार्डशी संबंधित आहे. जे कार्ड ब्लॉक करायचे आहे त्यावर क्लीक करा आणि डीटेल्स तपासा आणि कंफर्म ऑप्शन वर क्लीक करा. मोबाइल नंबरवर OTP किंवा प्रोफाइल पासवर्ड यापैकी एक पर्याय निवडा. मिळालेला OTP/प्रोफाइल पासवर्ड स्क्रीनवर टाका आणि कन्फर्म करा. त्यानंतर कार्ड ब्लॉक झाल्याच्या मॅसेज सोबतच स्क्रीनवर एक तिकीट नंबर मिळेल. हा तिकीट नंबर नोट करून ठेवा जेणेकरून कोणती अडचण आली तर तुम्ही बँकेला दाखवू शकता.

मॅसेजद्वारे कार्ड करा ब्लॉक –

मॅसेजद्वारे कार्ड ब्लॉक करणे खूपच सोपे आहे. SMS BLOCK XXXX (कार्डचे शेवटचे ४ नंबर) लिहून ५६७६७९१ या नंबरवर पाठवा. थोड्याच वेळात तुम्हाला कार्ड ब्लॉक झाल्याचा मॅसेज येईल.

कस्टमर केयर –

कस्टमर केयरवर कॉल करुन कार्ड ब्लॉक करता येईल. SBI कार्ड हेल्पलाइनशी संपर्क साधण्यासाठी १८६० १८०१२९० किंवा ३९०२०२०२ नंबर डायल करून आपली भाषा निवडा. त्यानंतर कार्ड चोरीला किंवा हरवल्याचा रिपोर्ट नोंदवण्यासाठी २ नंबर दाबा.

SBI अ‍ॅप –

SBI कार्ड मोबाईल अ‍ॅपद्वारे आपल्या खात्यात लॉग इन करा. डावीकडील Menu सेक्शनवर जा आणि Service Request वर क्लिक करा. त्यांनतर कार्ड चोरीला किंवा हरवल्याच्या ऑप्शनवर क्लिक करा. चोरीला किंवा हरवलेला कार्डचा नंबर निवडा. जर तेच कार्ड पुन्हा जारी करायचे असेल तर Reissue Card चा ऑप्शन निवडा. शेवटी सबमिट पर्यायावर क्लिक करा. तुमचे कार्ड ब्लॉक केले जाईल.

सिने जगत –

‘पद्मावत’ चित्रपटामध्ये रणवीरच्या ‘त्या’ दोन सीन बाबत मोठा खुलासा

पतिला सोडून अभिनेत्री जेनिफर विगेंट राहते आता ‘या’ अभिनेत्यासोबत

‘या’५ अभिनेत्रीच्या ‘सिंदूर’ लुकची ‘कमाल’ ; दिसतात ‘सुंदर’ आणि ‘संस्कारी’

VIDEO : भाईजान सलमान खानने ‘दबंग’ स्टाईलने ‘असा’ साजरा केला ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’

You might also like