Loan साठी SBI ची मोठी घोषणा ! कमी व्याजदरासह प्रोसेसिंग फीमध्ये 100 % सूट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आगामी काळात येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडिया नं आपल्या ग्राहकांसाठी अनेक ऑफर दिल्या आहेत. योनो ॲपद्वारे (YONO App) कार, सोनं, घर किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना कोणतेही प्रक्रिया शुल्क द्वावे लागणार नाही आज देशातील सर्वात मोठ्या ( स्टेट बँक ऑफ इंडिया नं ) बँकेनं – जाहीर केलं. कार लोनसाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना किमान 7.5 टक्के व्याजदरानं कर्ज मिळेल. यासह निवडक मॉडेल्सवर त्यांना 100 टक्के ऑनरोड फायनान्सिंगची सुविधा दिली जाणार आहे.

होम लोनसाठी खास सणांच्या ऑफर
मंजूर प्रकल्पात घरं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एसबीआय होम लोन वर कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही. या व्यतिरीक्त ही बँक अधिक चांगले क्रेडिट स्कोर आणि कर्जाची रक्कम असलेल्या ग्राहकांना 0.10 टक्के व्याजदरात विशेष सवलत देत आहे. या ग्राहकांनी एसबीआयच्या योनो ॲपद्वारे अर्ज केला तर त्यांना 0.5 टक्के विशेष सूट मिळेल.

गोल्ड लोन घेणाऱ्या ग्राहकांना खास ऑफर
एसबीआयनं गोल्ड लोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी ऑफर देखील जाहीर केल्या आहेत. अशा ग्राहकांना किमान 7.5 टक्के व्याजदरावर 36 महिन्यांसाठी सोन्याच्या कर्जाची परतफेड करण्याची सुविधा असेल. सध्याच्या संकटात ग्राहकांना परडवणारी कर्जाची उपलब्धता पहाता एसबीआय 9.6 टक्के दरानं वैयक्तिक कर्जाची ऑफर देत आहे.

योनो ॲपवर पेपरसेल कर्जाची सुविधा
डिजिटल बँकिंगची वाढती उपयुक्तता आणि मागणी लक्षात घेता एसबीआयनं योनो ॲप युजर्ससाठी ऑफरदेखील जाहीर केली आहे. योनो ॲपद्वारे या ग्राहकांना मुख्य कर्जाच्या मंजुरीच्या आधारे कार कर्जे आणि सोन्याच्या कर्जासाठी अर्ज करण्याची संधी मिळाली आहे.

आधीच्या मंजूर कर्जासाठी पात्रता कशी तपासायची ?
एसबीआय ग्राहकांना केवळ 4 क्लिकमध्ये योनो ॲपद्वारे प्री अप्रुव्ड पेपरलेस वैयक्तिक कर्ज मिळेल. यासाठी ग्राहकांनी प्रथम त्यांची पात्रता तपासली पाहिजे. प्री अप्रुव्ड कर्जाची पात्रता तपासण्यासाठी ग्राहकांना मेसेज बॉक्समध्ये PAPL टाईप करून 567676 वर SMS पाठवणं आवश्यक आहे.