खुशखबर ! SBI कडून महत्वाचा निर्णय, ‘गृह’ कर्ज आणखी ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आपल्या ग्राहकांना एक मोठा दिलासा दिला आहे. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या रेपो रेटमध्ये कपात केली होती. आतापर्यंत एस बी आयने थेट सर्वसामान्य ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. बँकेने आता गृह कर्जात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

आगामी काळात सुरु होणारे सण उत्सव लक्षात घेता बँकेने ग्राहकांसाठी सुखद धक्का दिला आहे. आता एस बी आय बँक गृहकर्जात 0.20 टक्क्यांनी कपात करणार आहे, म्हणजेच आता तुम्ही दिवाळी पर्यंत पहिल्या पेक्षा कमी दराने घर खरेदी करू शकाल. नवा व्याजदर 8.05 % इतका असेल. गेल्या अनेक दिवसांपासून बँक सर्वसामान्य ग्राहकांना उपयोगी येईल असे अनेक निर्णय घेत आहे.

गृहकर्जासाठी सुरु केलेला नवा व्याजदर हा सप्टेंबरपासून लागू होईल. पूर्वी हा दर 8.7 टक्क्यांहून 9 टक्क्यांपर्यंत होता. बँकेने कर्जाला रेपो रेट सोबत लिंक केलं आहे. त्यामुळे आता येत्या सप्टेंबर महिन्यापासून ग्राहक आपल्या घरासाठी विचार करू शकतात.

काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या व्याज दरात 0.25 टक्क्यांनी कपात केली होती. यानंतर बँकांनी आपल्या व्याज दरात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. स्टेट बँकेने पतधोरणापूर्वीच गृह कर्ज तसेच ठेवींवरील दर 0.05 टक्क्याने कमी केले होते. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी समूहातील बँक, वित्त कंपन्यांनी गृह कर्जावरील व्याजदर 0.10 टक्क्यापर्यंत कमी केले होते. रिझव्‍‌र्ह बँकेच्या मोठय़ा प्रमाणातील रेपो दर कपातीमुळे अन्य बँकाही स्वस्त कर्ज उपलब्धततेचा धडाका लावण्याची शक्यता आहे.

आरोग्यविषयक वृत्त-