…तर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला नसता !

पोलिसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत 5 ऑगस्टला राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडणार आहे.मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी आक्रमक झाले आहेत. ओवेसी यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमावरून टीका केली आहे. अयोध्येचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असला, तरी मी जिवंत असेपर्यंत हा मुद्दा बंद होणार नाही, असे म्हटले आहे.

कायदेशीरदृष्ट्या सर्वात वर असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. परंतु, मी जिवंत असेपर्यंत हा मुद्दा बंद होणार नाही. मी माझ्या कुटुंबाला, माझ्या लोकांना आणि भारतातील लोकांनाही, ज्या बहुसंख्य लोकांचा न्यायावर विश्वास आहे. एक मशीद तिथे होती. 6 डिसेंबर 1992 रोजी ती पाडली गेली. जर मशीद पाडली गेली नसती, तर हा कार्यक्रम (राम मंदिर भूमिपूजन) आयोजित करताच आला नसता, अशी टीका ओवेसी यांनी केली आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाच्या गरिमेनुसार या कार्यक्रमाला उपस्थित राहु नये. कारण पंतप्रधान आणि सरकारला कोणताही धर्म असत नाही. केंद्र सरकारला धर्म आहे का? या देशाला कोणता धर्म आहे का? नाही. पंतप्रधानांनी देशाला सांगावं की, ते पंतप्रधान म्हणून अयोध्येला जात नाही आणि भूमिपूजन कार्यक्रमाचे कोणतेही थेट प्रक्षेपण केले जाऊ नये, अशा शब्दात ओवसी यांनी मोदींवर निशाणा साधला.