सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं, म्हणाले – ‘जरा मुंबईकडून शिका…’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्याही वेगाने वाढताना दिसत आहे. त्यातच ऑक्सिजन संकटाच्या मुद्द्यावर केंद्राच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ‘मुंबईच्या बीएमसीने कोरोना काळात छान काम केले आहे. अशात दिल्लीने काही शिकायला हवे’, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी दिल्लीतील ऑक्सिजन संकटावर सल्ला दिला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘वैज्ञानिक पद्धतीने ऑक्सिजनच्या वितरणाची व्यवस्था करण्यात यावी. मुंबईच्या बीएमसीने कोरोना काळात छान काम केले आहे. अशात दिल्लीने काही शिकायला हवे. आदेशाचे पालन करणे, ही केंद्राची जबाबदारी आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. आम्ही बफर स्टॉक तयार करण्याचे संकेत दिले होते. अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईत केले जाऊ शकते, तर निश्चितपणे दिल्लीतही केले जाऊ शकते. दिल्लीला 700 मेट्रिक टन ऑक्सिजन केव्हा आणि कसा मिळेल, हे सोमवारपर्यंत सांगा, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

दरम्यान, चार अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकून ऑक्सिजन येणार नाही. जीव वाचविण्यावर आपल्याला लक्ष द्यावे लागेल. दिल्लीत कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. गेल्या तीन दिवसांत करण्यात आलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भातही सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला विचारणा केली आहे.