सुप्रीम कोर्टाचा वादग्रस्त Tandav च्या मेकर्स आणि अभिनेत्याला दणका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयानंही तांडवला मोठा दणका दिला आहे. या वादग्रस्त वेबससीरिज संबंधित असलेल्यांना सुरक्षा नाकारात त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले आहेत. तांडवच्या निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (बुधवार) सुनावणी झाली.

तांडवविरोधात सहा राज्यांमध्ये 7 FIR दाखल आहेत. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्यासोबत अनेकांविरोधात ही एफआयआर आहे. या सर्व एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. तसेच सुरक्षा पुरवण्याचीही मागणी करण्यात आली होती.

सुप्रीम कोर्टानं अभिनेता मोबम्मद झिशान अय्युब, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि तांडवच्या मेकर्सना अटकेपासून सुरक्षा देण्याचं नकारलं आहे. तसेच अटकपूर्व जामिनासाठी आणि एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश दिले आहेत.