सबरीमाला मंदिरात आता महिलांना प्रवेश 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

पुरुष पत्नीची मालमत्ता नाही असा ऐतिहासिक निर्णय दिल्या नंतर आज सुप्रिम कोर्टाने सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा अधिकार असल्याचा निकाल पाच न्यायमूर्तींचा खंडपीठाने दिला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ca504b40-c2e1-11e8-b334-e724b141b7c5′]

मंदिर प्रवेश ही कोणा एकाची मक्तेदारी नाही तर तो सर्वांचा अधिकार असल्याचे सुप्रिम कोर्टाने म्हटले आहे. सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश: केरळमधील सबरीमाला मंदिरात महिलांना मासिक पाळीदरम्यान प्रवेश दिला जात नाही. याविरोधात आॅगस्ट महिन्यात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा निकाल न्यायालयानं राखून ठेवला आहे होता. २००६ पासून कायद्याची ही लढाई सुरु होती.

अहमदनगरमधील शनी शिंगणापूर येथेही महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. त्याविरोधात महिला संघटनांनी केलेल्या याचिकेवर न्यायालयाने महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर महिलांनी आंदोलन करुन शनी शिंगणापूर येथील चौथऱ्यावर प्रवेश केला होता. त्यावेळेपासून सबरीमाला मंदिर प्रवेश प्रकरण ऐरणीवरआला होता.

सबरीमाला मंदिर: महिलांच्या प्रवेशाबाबत आज सुनावणी

महिलांना मासिक पाळी येत असल्याने १० ते ५० वयोगटातील महिलांना या सबरीमाला मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. १९६५ मध्ये केरळ शासनाने एक कायदा करुन त्याला कायदेशीर स्वरुप दिले होते. उच्च न्यायालयाने मंदिरांना नियम ठरविण्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केला आहे.

[amazon_link asins=’817992985X,B00FT694AC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’74896a1d-c2e2-11e8-9823-07816ff5619b’]