मुंबईत शिवसेनेची साथ सोडल्याने भाजपला ‘फटका’ !, BJP चा ‘तो’ दावा सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला, जाणून घ्या प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   शिवसेना आणि भाजप युती तुटल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत भाजपने शिवसेनेची साथ सोडली. त्यावरून महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदावर भाजपने दावा केला होता. हा दावा फेटाळून लावल्यामुळे, याबाबत भाजपने सर्वाच्च न्यालयामध्ये अर्ज केला होता मात्र सर्वाच्च न्यायालयानेही अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे आता मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडेच असणार आहे.

दरम्यान, भाजपाचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांनी केलेला अर्ज मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी मनमानी निर्णय घेत हा त्यांनी फेटाळून लावला आहे. असा आरोप शिंदे यांनी केला. तर या निर्णयामुळे त्यांनी रिट याचिकेद्वारे आव्हान दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनाही याचिकादारानी प्रतिवादी केले होते. शेवटी उच्च न्यायालयाने प्रभाकर शिंदे यांचा अर्ज फेटाळून लावल्याने त्याविरोधात शिंदे यांनी सर्वाच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वाच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या पीठाने त्याचे आव्हान फेटाळून लावले आहेत.

पुढच्या वर्षी येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणूक यावरूनच आता त्यापूर्वी भाजपासाठी हा एक मोठा धक्का बसला आहे. कारण विरोधी पक्षनेतेपद हे न भाजपकडे न राहता काँग्रेसकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच २८ फेब्रुवारी २०२० रोजी भाजपतर्फे मंगलप्रभात लोढा यांनी महापौरांना विनंतीपत्र देऊन प्रभाकर शिंदे यांची विरोधी पक्षनेता म्हणून नेमणूक करण्याची विनंती केली होती. मात्र ५ मार्च २०२० रोजी मुंबई महापौरांने मनमानी निर्णय हा विनंती अर्ज फेटाळून लावला आहे, असा आरोप भाजपने केला होता.