हैदराबाद रेप केस : 4 आरोपींच्या ‘एन्काऊंटर’ प्रकरणाच्या तपासासाठी ‘त्रिसदस्यीय’ आयोग, सुप्रीम कोर्टाचा आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैद्राबाद येथे झालेल्या बलात्कार केसनंतर पोलिसांनी चारही आरोपींचा इन्काउंटरमध्ये ठार केले होते. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने याबाबत तीन सदस्य समितीला अधिक तपास करण्यास सांगितले आहे याच्या प्रमुख पदी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश वीएस सिरपुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश रेखा बालदोता आणि माजी सीबीआय डायरेक्टर कार्तिकेन हे देखील असतील. तसेच या आयोगाला आपला निकाल सहा महिन्यात द्यावा लागणार आहे. जनहित याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय देण्यात आला.

निष्पक्ष तपास जरुरी
न्यायालयाने याबाबत राज्य सरकारची वेगळी तपासणी करण्याची याचिका फेटाळून लावली आहे आणि सांगितले की याबाबत निष्पक्षतेने तपास करणे गरजेचे आहे जेणेकरून याबाबतचे सत्य लोकांना समजेल. खंडपीठाने सांगितले की, चारही आरोपींच्या इन्काऊंटरचा तपास हा निष्पक्षतेने व्हायला हवा.

पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागली नाही
खंडपीठातील न्यायमूर्ति एस. ए. नजीर आणि न्यायमूर्ति संजीव खन्ना यांनी तेलंगणा सरकारला याबाबतच्या सर्व पैलूंबाबत तपास होणे आवश्यक असल्याचे सांगितले. सरकारी वकील असलेल्या रोहतगी यांनी सांगितले की, कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला गोळी लागलेली नसून कर्मचारी केवळ जखमी झालेले होते.

प्रसारमाध्यमांना देखील नोटीस
सर्वोच्च न्यायालयाने याबाबत प्रसार माध्यमांच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. न्यायालयाने सांगितले की, माध्यमांमुळे निष्पक्ष चौकशीला अडचण निर्माण होऊ शकते तरीही न्यायालयाने मीडियावर कोणतेच निर्बंध लादलेले नाही. मात्र न्यायालयाने रिपोर्टींगबाबत मीडियाला नोटीस देखील दिली आहे. तसेच अशा प्रकारच्या केसमध्ये मीडियाचा सहयोग असणे महत्वाचे आहे असे देखील न्यायालयाने स्पष्ट केले.

कसा झाला होता इन्काउंटर
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या हैद्राबाद बलात्कार घटनेचा शेवट सर्वांनाच परिचित आहे. तपासासाठी नेण्यात आलेल्या आरोपींनी पळून जाण्यासाठी पोलिसांवर गोळीबार केला आणि पोलिसांच्या प्रती हल्ल्यात चारही आरोपी ठार झाले होते. यानंतर संपूर्ण देशात याबाबत आनंद व्यक्त केला जात होता. तर अनेकांनी सोशल मीडियावरून तेलंगणा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव देखील केला होता.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/