शारदा चिटफंड घोटाळा : ममता बॅनर्जींना मोठा झटका ; पुरावे नष्ट करणाऱ्या ‘त्या’ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यावर अटकेची टांगती तलवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शारदा चिटफंडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना मोठा झटका दिला आहे. पश्चिम बंगालचे आयपीएस अधिकारी राजीव कुमार यांच्या अटकेला स्थगिती दिली आहे. सीबीआय आपलं काम करु शकते. मात्र हा निर्णय सात दिवसांनंतर लागू होणार आहे. तोवर ते कायदेशीर पावलं उचलू शकतात.

शारदा चिटफंड प्रकरणात झालेल्या घोटाळ्यात पुरावे नष्ट केल्याचा आरोप राजीव कुमार यांच्यावर आहे. याप्रकरणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर कोलकाताचे माजी पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. सात दिवसांनंतर सीबीआय त्यांना अटक करू शकते. परंतु तत्पुर्वी ते आपल्या जामीनासाठी अर्ज दाखल करू शकतात. मात्र त्यांचा जामीन फेटाळल्यास त्यांना सीबीआय अटक करू शकते. असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.