पुणे मनपात वृक्षगणना निविदा प्रक्रियेत ‘घोटाळा’ ! ‘SAAR’ IT रिसोर्सेस प्रा.लि. कंपनीसह 2 मोठ्या कंपन्या आणि चौघांना कोट्यावधींचा दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन : पुणे महानगरपालिकेतील वृक्षगणना निविदा प्रक्रियेत अनियमितता केल्याप्रकरणी भारतीय स्पर्धा आयोगाने सार आयटी रिसोर्सेस प्रा.लि. या कंपनीसह इतर दोन कंपन्यांना आणि चार व्यक्‍तींना मोठा दंड ठोठावला आहे. याबाबतचे आदेश भारतीय स्पर्धा आयोगाने दिले आहेत. आयोगाने एवढा मोठा दंड ठोठावल्याने खळबळ उडाली आहे.

पुणे महापालिकेतील वृक्षगणना निविदा प्रक्रियेत अनियमितता प्रकरणी भारतीय स्पर्धा आयोगाने तीन कंपन्यांना २.७० कोटी ( दोन कोटी सत्तर लाख रुपये) इतकादंड ठोठावला आहे . तर कंपन्यांच्या चार संचालकांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. या संदर्भात नागरिक चेतना मंचने भारतीय स्पर्धा आयोगाकडे तक्रार केली होती. दंड ठोठावण्यात आलेल्या कंपन्या पुढील प्रमाणे

१) SAAR आयटी रिसोर्सेस प्रा.ली १.२६ कोटी ( एक कोटी सव्वीस लाख)
२) CADD सिस्टीम अँड सर्विसेस प्रा.ली ११ लाख रुपये
३) पेंटॅकल कन्सल्टंटस इंडिया प्रा ली १.३३ कोटी ( एक कोटी तेहतीस लाख रुपये)

तर ज्या व्यक्तींना दंड करण्यात आला त्यांची नावे 
१) अरुण राव २,४०,२५८ ( दोन लाखा चाळी हजार दोनशे अट्ठावन्न रुपये)
२) अजय राव १,६९,२९८( दोन लाख एकोणसत्तर हजार दोनशे अट्ठ्यान्नव)
३) पंकज बोब्रा ७९,९५९ ( एकोणऐंशी हजार नउशे एकोणसाठ)
४) चेतन पठारे ५७,९८४ ( सत्तावन्न हजार नउशे चौ-याऐंशी )

सदर दंडाची रक्कम ६० दिवसात भरायची आहे.
जीआयएस आणि जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून वृक्षगणना करण्यासाठी पुणे महापालिकेने निविदा मागवल्या होत्या त्यात निविदाराला फायदा करून देण्याच्या हेतूने निविदेच्या अटी बदलल्याचा  आरोप करून नागरिक चेतना मंचने भारतीय स्पर्धा आयोगाकडे तक्रार केली होती.
आरोग्यविषयक वृत्त –