लाखो रूपयांचा घोटाळा करणार्‍या महिला पोलिस निरीक्षकाच्या घरावर छापा, जप्‍त केली ‘एवढी’ रक्‍कम

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशात गाजियाबादमध्ये पोलिसांचा एक मोठा घोटाळा समोर आला आहे. गाजियाबादमधील महिला इंस्पेक्टर लक्ष्मी सिंह चौहान यांच्या विरोधात पैशांचा घोटाळा केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गाजियाबाद लिंक रोडवर गस्तीवर असताना एका प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते त्यांच्याकडून कोट्यावधीची रक्कम जप्त करण्यात आली होती. परंतू लक्ष्मी चौहान पोलिसांच्या मदतीने लिखापडी करताना रक्कम कमी दाखवण्यात आली. महिला इंस्पेक्टरवर 70 लाख रुपयांच्या घोटाळा केल्याचा आरोप लावण्यात आला.

शुक्रवारी रात्री महिला इंस्पेक्टरने सरकारी घरावर गाजियाबाद एसपी सिटी श्लोक कुमारने छापा टाकला. या दरम्यान या महिला इंस्पेक्टरच्या घरातून 1 लाख 25 हजार रुपये जप्त केले. पोलीस जेव्हा लक्ष्मी चौहान यांच्या घरात पोहचले तेव्हा घराला कुलूप होते. पोलिसांनी घराचे कुलूप तोडले आणि रक्कम जप्त करण्यात आली.

पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, पैशांत झालेल्या या घोटाळ्याचे एटीएममध्ये पैसे टाकणाऱ्या कंपनी सीएमएसच्या 2 कर्मचाऱ्यांशी जोडलेले आहे. कर्मचाऱ्यांना एटीएममध्ये पैसे टाकताना पैशात घोटाळा केला. हे प्रकरण गाजियाबादच्या लिंक रोड पोलीस स्टेशन पर्यंत पोहचले आणि तपास लक्ष्मी चौहान यांच्यापर्यंत पोहचले. लक्ष्मी चौहान यांनी 2 आरोपींना ताब्यात घेताना काही रक्कम ताब्यात घेण्यात आली.

आरोपीच्या चौकशीनंतर आरोपींनी खुलासा केला की रक्कम लिंक रोडच्या पोलीस ठाण्याने जप्त केली होती. दाखवण्यात येत असल्यापेक्षा जास्त रक्कम त्यांच्याकडून जप्त करण्यात आली होती. त्यानंतर लक्ष्मी चौहान यांच्यासह 7 पोलिसांवर एफआयआर दाखल करण्यात आली आणि त्यांना निलंबित करण्यात आले. परंतू अटक होईल या भीतीने लक्ष्मी चौहान यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी फरार आहेत.

Visit : Policenama.com