धक्कदायक….तलावरीने वार करुन  पोलिस पाटलाच्या पत्नीची हत्‍या

जुन्नरः पोलीसनामा आॅनलाईन-

पोलीस पाटलाच्या पत्नीची तलवारीने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील साकोरी गावात घडली. संगीता देविदास साळवे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. गावचे पोलीस पाटील देविदास साळवे यांच्या पत्नी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=”]

सदर घटनेशी सबंधीत असणारे शिवाजी साळवे यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर शिवाजी साळवे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी धाव घेतली असून, या घटनेचा तपास करत आहेत.