#Video : सामना सुरु असताना महिलेचा ‘तोडक्या’ कपड्यात मैदानात ‘धिंगाणा’

माद्रिद : वृत्तसंस्था – स्पेनची राजधानी माद्रीद येथे सुरु असलेल्या फुटबाॅल चॅम्पियन्स लिगचा फायल सामना सुरु असताना एक महिला आपल्या लाडक्या खेळाडूला भेटण्यासाठी अत्यंत तोडक्या कपड्यात मैदानात आली. अत्यंत कडक सुरक्षा असताना देखील ही मला सुरक्षा कवच भेदून मैदानात आल्याने सुरक्षा रक्षकांची पळताभुई थोडी झाली. हा प्रकार शनिवारी रात्री घडला.

माद्रीदमध्ये युरोपियन चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना शनिवारी मध्यरात्री खेळवण्यात आला. अंतिम सामना टोदनहॅम आणि लिव्हरपूल या इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये खेळवण्यात आला. हा सामना सुरु असताना एक महिला अत्यंत तोडक्या कपड्यात मैदानात पोहचली. ही महिली मैदानात कशी आली हे सुरक्षा रक्षकांना ही समजले नाही.

काळ्या रंगाचा वन पीस तोकडा ड्रेस घातलेल्या या महिलेमुळे सामना बराच वेळ थांबवावा लागला. या महिलेला पकडण्यासाठी सुरक्षा रक्षकांची चांगलीच पळापळ झाली. अखेर सुरक्षा रक्षकांनी या महिलेला पकडून तिची समजूत काढून कसंबसं तिला मैदानाबाहेर काढल. दरम्यान लिव्हरपूलने 2-0 अशा फरकाने चॅम्पियन्स लीगचा चषक नावावर केला.