दुर्देवी ! ‘कोरोना’च्या भीतीनं आईचा मृतदेह स्वीकारण्यास मुलाचा नकार, जिल्हा प्रशासनानं केले ‘अंत्यसंस्कार’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला असून नात्यांमध्येही दुरावा आणत असल्याचे दिसून आले आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग होईल या भीतीमुळे एका मुलाने स्वतःच्या आईचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याची घटना पंजाबच्या लुधियानामध्ये घडली आहे.
संबंधित वृद्ध महिलेचा मृतदेह तिच्या कुटुंबियांनी स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

महिलेच्या ‘अंत्यसंस्कारावेळी कोरोनाच्या संसर्गापासून बचावाची खबरदारी घेतली जाईल आणि त्यासाठी आवश्यक संरक्षणात्मक साहित्य पूरवले, अशी ग्वाही अधिकार्‍यांनी दिल्यानंतरही मुलाने आणि कुटुंबियांनी महिलेचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला’, अशी माहिती पोलिसांनी दिली. लुधियानाच्या शिमलापुरी गावातील करोनाग्रस्त 69 वर्षीय महिलेचा सोमवारी(दि.6) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. महिलेचा मृतदेह प्रशासनाने तिच्या कुटुंबियांना सोपवण्याची तयारी केली, मात्र कोरोनाची लागण होईल या भीतीने महिलेच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.

अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त इकबाल सिंह संधू यांनी दिली. मृतदेह स्वीकारण्यासाठी मुलाने आणि उर्वरित कुटुंबियांनीही नकार दिल्याचा मोठा धक्का बसला. आम्ही दोन वेळेस त्यांच्याशी संपर्क साधला पण करोनाचा संसर्ग होईल या भीतीमुळे त्यांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. अखेर जिल्हा प्रशासनालाच अंत्यसंस्कार करावे लागले. अंत्यसंस्कारावेळी नातेवाईक आले होते, पण त्यांनी 100 मीटर अंतरावरुनच अखेरचा निरोप दिला, अशी माहिती संधू यांनी दिली.

You might also like