तेलंगणा : पोलीसनामा ऑनलाईन – Scheduled Caste Classification | अनुसुचित जाती समुदायाचे उपवर्गीकरण करणारे तेलंगणा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तेलंगणातील काँग्रेस सरकारने सोमवारी याचे आदेश जारी केले आहेत. विधिमंडळाच्या अधिनियमाला ८ एप्रिल २०२५ रोजी तेलंगणाच्या राज्यपालांची स्वीकृती मिळाली व १४ एप्रिल रोजी तेलंगणाच्या राजपत्रात प्रथमच प्रकाशित करण्यात आले.
अनुसूचित जाती वर्गीकरणावरील एका उप समितीचे प्रमुख व मंत्री रेड्डी यांनी सांगितले की, सरकारी आदेशाची पहिली पत्र आज सकाळी मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांना देण्यात आली. त्यांनी सांगितले की, आज, या क्षणापासून तेलंगणामध्ये रोजगार व शिक्षणात एससी वर्गीकरण लागू करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एससी वर्गीकरण लागू करणारे तेलंगणा पहिले राज्य आहे. २०२६च्या जनगणनेत एससी लोसकंख्या वाढल्यास आरक्षणही त्यानुसार वाढवण्यात येणार आहे.