अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाच्या मुदतीमध्ये १० वर्षांनी वाढ, विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात राज्यपालांनी केले जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. या अधिवेशनादम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सरकारच्या वतीने महत्वाचे निवेदन सादर केले यामध्ये सरकारने सत्तेवर येताच कोणत्या कोणत्या योजना सुरु केल्या आहेत आणि भविष्यात कोणती महत्वाची कामे करणार आहेत याबाबद्दलची माहिती दिली.

विशेष म्हणजे या अधिवेशनादरम्यान अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाची मुदत १० वर्षांनी वाढवण्यात आल्याचे सांगण्यात आले तसेच यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या निवेदनाच्या मार्फत संयुक्त महाराष्ट्रातील हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. संयुक्त महाराष्ट्रासाठी हे ६० वे वर्ष आहे. तसेच या विशेष अधिवेशनामार्फत हे सरकार सर्व प्रकारच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

या सरकारने बळीराजासाठी कर्जमाफी दिलेले आहे तसेच गरीब व गरजू लोकांच्या कल्याणासाठी शिवभोजन थाळी देखील राज्यभर सुरु करण्यात येणार आहे . टप्याटप्प्याने ही थाळी जिल्ह्या जिल्ह्यात पोहचेल अशी माहिती देखील यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी दिली.

मराठी रंगभूमीच्या चळवळीस १७५ वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे या वर्षी मुंबईत या संबंधीचा इतिहास सांगणारे संग्रहालय स्थापन करणार असल्याची देखील घोषणा यावेळी भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी केली. तसेच महिलांच्या सुक्षेसाठी शासन प्रयत्नशील राहणार आहे आणि जनतेला लाभदायी असलेल्या योजना राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील यावेळी कोश्यारी यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/