‘बाप’ टेक्नॉलॉजी ! आता Gmail करा Shedule आणि Recall

नवी दिल्ली : सध्याच्या काळात प्रत्येकाकडे ई मेलचे खाते असणे गरजेचे झाले आहे. कोणताही महत्वाचा फॉर्म भरायचा असेल, आवश्यक माहिती पाठवायची असेल, कागदपत्रे पाठवायची असतील तर इमेलचा वापर केला जातो. ईमेलमध्ये अधिकाधिक पसंती जीमेलला मिळताना दिसून येते. जीमेलमध्ये आता गुगलकडून नवीन सुविधा दिली आहे. गुगलकडून जीमेल युजर्सना sheduling आणि recall हे दोन नवे फीचर्स देण्यात आले आहेत.

गुगलकडून पुरविण्यात येणारी जीमेल सर्व्हिस ही जगातील सर्वात मोठी सेवा आहे. गुगलचा १५ वा वर्धापन दिन गेल्या महिन्यात साजरा करण्यात आला आहे. गुगल युझर्ससाठी गुगलकडून नेहमीच वेगवेगळ्या सुविधा पुरवण्यात येतात.

जीमेलही करा shedule
sheduling या पर्यायामध्ये आपल्याला हवी ती तारीख, वेळ लावता येऊ शकते. त्यासाठी आपल्याला मेल कधी पाठवायचा आहे त्याची वेळ, तारीख सेट करून ठेवता येऊ शकते. या सुविधेचा अनेक जीमेल ग्राहकांना फायदा मिळणार आहे.

जीमेल करा recall
एखाद्या व्यक्तीला पाठवलेला मेल रिकॉल करता येऊ शकत नव्हता. मात्र आता नवीन सुविधेमुळे हे शक्य होणार आहे. आपण पाठवलेला मेल ३० सेकंदाच्या आत रिकॉल करता येऊ शकतो. त्यासाठी सेटिंगमध्ये जाऊन enable undo save सिलेक्ट करा. यानंतर send cancellation period येईल. हे केल्यानंतर रिकॉल करता येईल.

महिलांनी पालेभाज्या खाल्ल्या तर नेहमी राहतील फिट

वजन खूपच कमी आहे का ? मग ‘हा’ आहार तुमच्यासाठी आहे फायदेशिर

नवाजुद्दीनच्या चित्रपटामध्ये मौनी रॉय ऐवजी येणार ही ‘अभिनेत्री’

‘धडकन’मधील ‘देव’ची मुलगी आथियाला स्टार क्रिकेटर केएल राहूल करतोय ‘डेट’

मराठा आरक्षण : राज्यामध्ये मिळाले आता केंद्राच्या नोकऱ्यांमध्येही लागू झाले पाहिजे : आमदार हर्षवर्धन जाधव