शास्तीकर वेळेत भरल्यास सवलत योजनेस स्थायी समितीत मान्यता

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

मनपाच्या थकीत मिळकत करावर आकारण्यात आलेल्या मनपा कर शास्तीमध्ये थकबाकीसह मिळकत कराची संपूर्ण रक्कम एक रक्कमी ०१ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०१८ अखेर भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना मनपाकर शास्ती रकमेच्या ९०% व दि. १६ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ अखेर भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना मनपाकर शास्ती रकमेच्या ७५% सवलत देण्याच्या अभय योजनेस स्थायी समितीने मान्यता दिली. तसेच शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे  ३४ कोटी २६ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fc612ebc-c0de-11e8-a4da-5db63a5885d6′]

मनपाच्या भोसरी येथील अंकुशराव लांडगे प्रेक्षागृह इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेसाठी नविन रिंग मेन पाईप लाईन टाकणेकामी येणाऱ्या सुमारे ५६ लाख १३ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. काळेवाडी, रहाटणी भागातील पवना नदीच्या कडेने मुख्य गुरुत्व वाहिनीची सुधारणा विषयक कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे ४२ लाख ७८ हजार रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व झोपडपट्ट्या यांमधील अनधिकृत नळजोड नियमित करण्यासंबधीचा विषय मा. महापालिका सभेपुढे ठेवण्यास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

नवी सांगवी मुख्य जलनि:सारण नलिकामध्ये सुधारणा करण्यासाठी येणाऱ्या सुमारे  ४९ लाख ७३ हजार रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड मनपाचे विविध विभागांसाठी लेनोव्हा या उत्पादित कंपनीचे आवश्यक संगणक संच साहित्य खरेदी करण्यासाठी येणाऱ्या सुमारे २५ लाख ४८  हजार रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. बीआरटी कॉरीडॉर क्र.३ वर सुदर्शन नगर चौक येथे ग्रेड सेपरेटर (समतल विलगक) बांधण्यासाठी येणाऱ्या सुमारे २५ कोटी ७३ लाख ५६ हजार रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.
[amazon_link asins=’B072SWSQ1F’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0227e8c9-c0df-11e8-9802-b981fc3ca835′]

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व बालवाड्यांच्या भिंती ३ डी पेंटिंगद्वारे बोलक्या करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
१४ नोव्हेंबर च्या बालदिनानिमित्त पी.डब्ल्यू.डी. मैदान व भोसरी येथे दि. १३ व १४ नोव्हेंबर २०१८ रोजी बालजत्रेचे आयोजन करण्यास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा आयोजित करणेस स्थायी समिती बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषक जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करणेस स्थायी समिती बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.
[amazon_link asins=’B00TFGWAA8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3dab0511-c0e2-11e8-8ec6-2332d1b90f43′]

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यास स्थायी समिती बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. मनपाच्या सर्व विभागांना उपयुक्त अशी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील हवाई छायाचित्रे पुणे महानगरपालिका प्रादेशिक विकास प्राधिकरण यांचेकडून खरेदी करणेकामी येणाऱ्या ५३ लाख ९३ हजार रुपयांच्या खर्चासही स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरी : पोलिसांमधील वाईट सवयी संपवणार : पद्मनाभन

पुणे | पार्किंगमधील हॉटेल्सवर कोरेगाव पार्क पोलिसांची कारवाई