तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथील पाझर तलावात दहा वर्षांच्या शाळकरी मुलाचा आज मृत्यू झाला. यश बबन थोरात (वय १०, रा. नांदूर खंदरमाळ) हे मयताचे नाव आहे. पाझर तलावाजवळून जाणाऱ्या एकाने पाण्यावर तरंगणारा मृतदेह पाहिल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नांदूर खंदरमाळ येथील पाझर तलाव पावसाच्या पाण्यामुळे भरला आहे. आज पोलिस पाटील किसन पंढरीनाथ सुपेकर हे पाझर तलावाजवळून जात होते. सताना त्यांना एक मुलगा तळ्यात बुडाल्याचे दिसले. नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने तळ्यातून मुलाला बाहेर काढले. त्यानंतर उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात पोलीस पाटील किसन सुपेकर यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like