
५० विद्यार्थ्यी घेऊन जाणाऱ्या बसला भीषण अपघात…
गुंटूर : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात सोमवारी सकाळी शालेय बसला भीषण अपघात झाला. जवळपास ५० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बस पुलावरून कोसळली. या अपघातात किमान १५ विद्यार्थी जखमी झाले असून त्यापैकी ३ जण गंभीर आहेत. सर्वच विद्यार्थ्यांना उपचारासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधील सर्वच विद्यार्थी गुंटूरच्या कृष्णावेणी टॅलेंट स्कूलचे होते.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आज सकाळी पुलावरून जात असताना शालेय बस घसरली आणि पुलाखाली पलटी झाली. या घटनेत बसमधील शाळेचे सर्व विद्यार्थी जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी वेळीच बचाव कार्याला सुरुवात केली त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचाव मोहीम तीव्र करण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. बसच्या चालकाची चौकशी केली असता या बसचा चालक नशेत असल्याचे समजले. दरम्यान पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
ही बस सोमवारी सकाळी शाळेच्या दिशेने जात होती. या बस अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. घटनास्थळावरून समोर आलेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये बस उलटल्याचे दिसून येत आहे. सोबतच, सभोवताल जमलेली गर्दी आणि लहान मुलांचे टिफीन तसेच स्कूल बॅग सुद्धा दिसत आहेत.
हवाई दलाचे ‘ते’ लढाऊ विमान कोसळले
याला लवकर भारतात न्या, चोक्सीमुळे आमची जगभर बदनामी : अँटिग्वा सरकार
अन् राजकीय पुढार्यांना केली गावबंदी