School Bus Fare | पालकांना महागाईचा आणखी एक झटका, स्कूल बसचे शुल्क वाढणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे (Petrol-diesel Price Hike) सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना दुसरीकडे पालकांना आणखी एक मोठा झटका बसणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून स्कूल बसच्या शुल्कात मोठी वाढ (School Bus Fare) करण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशनने (School Bus Association) घेतला आहे. असोसिएशनने स्कूल बस दरामध्ये (School Bus Fare) 25 ते 30 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालकांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.

 

मागील काही दिवसांपासून स्कूल बस चालक-मालकांना इंधन दरवाढ (Fuel Price Hike) आणि इतर कारणांमुळे मोठा फटका बसला आहे. मागील वर्षी वाढत्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस ओनर्स असोसिएशनने स्कूल बस शुल्कात वाढ (School Bus Fare) केली होती. आता पुन्हा 1 एप्रिल 2023 पासून नव्या शैक्षणिक वर्षासाठी शाळेच्या बसेसचे शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्कूल बसच्या शुल्कात 25 ते 30 टक्के वाढ होणार आहे.
दरवाढीची कारणे

केंद्र सरकारने (Central Government) नवे स्क्रॅपिंग धोरण अवलंबले आहे. याचा फटका स्कूल बस चालकांना बसणार आहे. तसेच बस गाड्यांच्या किंमतीत झालेली वाढ, वाहनांचे स्पेअर पार्ट्स, टायर आणि बॅटरीच्या दरात 12 ते 18 टक्क्यांची वाढ. त्यामुळे बसचा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. याशिवाय वाहतूक कोंडीत (Traffic Jam) वाढ होत असल्याने इंधन जास्त लागत असल्याने इंधनाचा खर्च वाढला आहे. याकडे असोसिएशनने सरकारचे लक्ष वेधले आहे. तसेच बसवर काम करणाऱ्या चालकांचे पगार वाढले आहेत. त्यामुळे शुल्कात वाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.

 

राज्यात साधारणपणे 44 हजार स्कूल बस आहेत. तर एकट्या मुंबईत साडे आठ हजारांच्या जवळपास स्कूल बस आहेत.
साधारण प्रति विद्यार्थी 1500 किमान शुक्ल आहे. स्कूल बसच्या दरवाढीमुळे पालकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

 

Web Title :- School Bus Fare | Another blow to inflation for parents, school bus fares to rise

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sudhir Mungantiwar | राज ठाकरेंच्या सभेनंतर भाजपची उद्धव ठाकरेंना ‘ऑफर’?, सुधीर मुनगंटीवार म्हणाले – ‘उद्धवजी, अजूनही…’

Pune Crime News | पुण्यातील नाना पेठेत थरार ! हत्याराचा धाक दाखवुन भरदिवसा व्यापार्‍याचे 47 लाख लुटले

Pune PMC Property Tax | 40 टक्के करासहीत भरलेली रक्कम परत कारावी, महापालिका आयुक्तांकडे मागणी