School Diwali Holiday | महाराष्ट्रातील शाळांना शिक्षणमंत्र्यांकडून दिवाळीची सुट्टी जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांशी (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) संलग्न पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना दिवाळीची सुट्टी (School Diwali Holiday) जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर म्हणजे 14 दिवसांची दिवाळीची सुट्टी जाहीर (School Diwali Holiday) केली आहे. या काळात शाळांकडून सुरु असलेले ऑनलाईन अध्यापनही बंद राहील असे गायकवाड यांनी आदेशात स्पष्ट केलं आहे. त्याबरोबर त्यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा 4 ऑक्टोबर पासून ऑफलाईन स्वरुपात सुरु झाल्या आहेत. राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वी च्या शाळांना विविध धार्मिक सण/उत्सवासाठी सुट्ट्या घोषित करण्यात येत असतात. त्यानुसार 2021-22 या शैक्षणिक वर्षात दिवाळी सणाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत सुट्टी घोषित (School Diwali Holiday) करण्यात येत आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरु असलेले अध्यापनाचे कामकाज बंद राहील, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

 

तारखांमुळे संभ्रम

शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकात (circular) 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर शिक्षण, अधिकारी, शिक्षण निरीक्षक यांच्या परिपत्रकानुसार 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीची सुट्टी असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्या नेमक्या कधी आणि कशा द्यायच्या? असा प्रश्न शिक्षकांसमोर उपस्थित झाला आहे. ऐनवेळी म्हणजेच सुट्या जाहीर करण्याच्या एक दिवस आधि परिपत्रक काढल्याने हा गोंधळ वाढला आहे.

 

Web Title :- School Diwali Holiday | maharashtra school diwali holiday education minister announces diwali holiday but confusion over dates

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Multibagger Stock | शॉर्ट टर्ममध्ये कमाईची मोठी ‘सुवर्ण’संधी ! ‘या’ स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचा तज्ज्ञांचा सल्ला

Sameer Wankhede | ‘मी दलित, माझे पूर्वज हिंदू, मग मुलगा मुसलमान कसा झाला’; समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव

Aryan Khan Drugs Case | आर्यन खानची सुटका पुन्हा लांबणीवर? आजची रात्र जेलमध्येच; कोर्टात नेमकं काय झालं, जाणून घ्या