school education minister varsha gaikwad | 12 वी च्या परीक्षेच्या मूल्यमापनासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची महत्वाची माहिती, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ही दिवसापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने (Thackeray government) राज्यातील इयत्ता 12 वीच्या (HSC Exam) परीक्षा रद्द करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. मात्र ही परीक्षा रद्द झाल्यानंतर 12 वीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन (Evaluation) आणि त्यांचे गुणांकन (Score) कसं होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांत (In students and parents) चर्चा सुरु होती. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (School Education Minister Varsha Gaikwad) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.12 वी परीक्षेच्या अंतर्गत मूल्यमापनचे धोरण लवकरच जाहीर केले जाईल. त्यानंतर सुधारित मूल्यमापनाचे धोरण आणि निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर केले जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

दरम्यान, राज्य सरकारकडून (State Government) शुक्रवारी संध्याकाळी 12 वीच्या सर्वच विद्यार्थ्यांना पास (Pass to students) करण्याचा निर्णय घेतल्याचा जीआर काढण्यात आला आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर यासंदर्भातली घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य अन् सुरक्षिततेच्या ( Health and safety of students) दृष्टीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी 12 वीची परीक्षा रद्द करण्यात येत आहे. 12 वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे पास करावे असे जीआरमध्ये नमूद केले आहे. जीआरमध्ये अंतर्गत मूल्यमापनासंदर्भात देखील माहिती दिली आहे.12 वीची परीक्षा रद्द झाल्याने अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीबाबत, तसेच गुणपत्रक देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश जारी केले जाईल, असे यात नमूद केले आहे.

Web Title :- school education minister varsha gaikwad | maharashtra hsc exam update education minister varsha gaikwad

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

COVID-19 in India : 70 दिवसानंतर कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात आली 84 हजार प्रकरणे; 4002 जणांचा मृत्यू

चुकूनही करू नका LIC चे ‘हे’ काम, अन्यथा विमा कंपनी करू शकते कठोर कायदेशीर कारवाई; जाणून घ्या

Adar Poonawalla Security | सुरक्षेची मागणी करताच सुरक्षा पुरवणार, राज्य सरकारची न्यायालयात ग्वाही

Pimpri Chinchwad News | रिक्षाचालकांकडे 2 हजार रुपये खंडणी मागणार्‍या टोळीतील 5 जणांना अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा