धक्कादायक ! जवानांसह तिघांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारमध्ये एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तीन आरोपींनी या मुलीवर हा गँगरेप केला असून धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये आयटीबीपी मधील एका जवानाचा देखील समावेश आहे. बलात्कार केल्यानंतर या आरोपींनी पीडितेला झाडींमध्येच सोडत पलायन केले.

पीडित मुलगी हि ८ वि मध्ये शिकण्यास असून घटनेनंतर तिला छपरामधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल आल्यानंतर तिला पटनामधील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे. घटना घडल्यानंतर पीडित मुलगी जखमी अवस्थेत घरी आल्यानंतर नातेवाईकांनी तिला तात्काळ उपचारासाठी दाखल केले. आरोपी पीडितेच्या गावातीलच रहिवासी असल्याचे सांगण्यात येत असून पोलीस तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. बलात्कार केल्यानंतर मुलीच्या प्रायव्हेट भागात रॉड घुसवल्याची अफवा देखील पसरली होती. मात्र मुलीच्या वडिलांनी हे खोटे असल्याचे सांगितले. तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार शाळेतून घरी येत असताना तिला जबरदस्ती उचलून तिच्यावर अत्याचार करण्यात आले.

दरम्यान, पोलीस अधीक्षक हरकिशोर राय यांनी दोन आरोपींना अटक केल्याची माहिती दिली आहे. आयटीबीपी मधील जवानाची देखील तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like