14 वर्षाच्या मुलीला पळवून नेले मुलाने, तीन मित्रांनी केला गँगरेप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार राजस्थानातील धौलपुर जिल्ह्यामध्ये घडला आहे. ही मुलगी दहावीमध्ये शिकत होती आणि आरोपी अकरावीमध्ये शिकत होता. त्याने मुलीला फसवून जयपूर,हिमाचल प्रदेश आणि दिल्लीमध्ये नेले होते.

पोलिसांनी कारवाई करत अल्पवयीन मुलीला आणि चारही मुलांना दिल्लीमधून ताब्यात घेतले आणि मुलीची मेडिकल तपासणी सुरु केली. 30 सप्टेंबरला मुलीला फसवून नेल्यानंतर तिच्या वडिलांनी 2 ऑक्टोबर 2019 ला पोलिसांत तक्रार दाखल केली होती त्यामध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे.

चारही अल्पवयीन मुलांनी आधी मुलीला जयपूरला नेले त्यानंतर हिमाचल प्रदेश येथे नेले आणि नंतर दिल्लीला येत असताना पोलिसांनी मुलांच्या मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले आणि मुलीसह चारही मुलांना दिल्ली निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले. याबाबतचा अधिक तपास करणाऱ्या उप पोलीस अधीक्षक देवीसहाय मीना यांनी सांगितले की अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तीला पळवून नेल्याबद्दल चारही मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे आणि अल्पवयीन मुलीचे मेडिकल टेस्ट करण्यात आले असून चारही मुलांची चौकशी सुरू आहे.

 

Visit : Policenama.com