धक्कादायक ! भावाला मारण्याची धमकी देत पुण्यात आठवीतील मुलीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – धानोरी येथे राहणाऱ्या एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मी सांगीन तस केले नाही तर तुझ्या भावाला मारून टाकीन अश्या प्रकारची धमकी मुलीला देण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, आरोपी पसार झाला आहे. धनंजय मारमिल्ले (वय २८, रा. धानोरी) याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलगी धानोरी परिसरात आई वडील आणि भावासोबत राहत असून ती आठवीत शिकत आहे. बुधवारी आईवडील बाहेर गेले असताना आरोपी तिच्या घरी आला आणि मी सांगेन तसे कर नाहीतर तुझ्या भावाला मारून टाकीन अशी धमकी देत मुलीला स्वतःच्या घरी नेण्याचा प्रयत्न केला. मुलीने नकार दिल्यावर आरोपीने तिच्या भावाला मारण्याची धमकी देत तिला घरात ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

मुलीच्या मामाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्याने मुलीची आई मुलीला शाळेतून घरी नेण्यासाठी गेली. त्या वेळी पीडितेच्या आईला ती शाळेत गेली नसल्याचे समजले. त्यामुळे आई मुलीचा शोध घेऊ लागली. या वेळी मुलगी आरोपीच्या घरात विवस्त्र अवस्थेत रडताना दिसून आली.

मुलीला घरी आणल्यानंतर आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, घडलेला प्रकार मुलीने सांगितलं या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

चार महिन्यात आठ बलात्कार
विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या चार महिन्यांत आठ अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. यातील पाच गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात आली असून, तीन गुन्ह्यांतील आरोपी अद्याप फरारी आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like